बंगळूर : दहावीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत होणार आहे. परिक्षेचे अंतिम वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी याबाबत ट्विट केले आहे. अधिकृतपणे त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. नेहमीप्रमाणे पहिला पेपर प्रथम भाषेचा आहे. त्या दिवशी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचा पेपर असेल. १५ एप्रिल रोजी समाज विज्ञान पेपरने परिक्षेची सांगता होईल. त्यानंतर महिनाभरात निकाल लागण्याची अपेक्षा आहे. दहावी परीक्षा वेळापत्रक तारीख विषय ३१ मार्च ४ एप्रिल ६ एप्रिल प्रथम भाषा (मराठी, कन्नड, इंग्रजी) गणित द्वितीय भाषा ( इंग्रजी, कन्नड) विज्ञान १० एप्रिल १२ एप्रिल १५ एप्रिल समाज विज्ञान. तृतीय भाषा (इंग्रजी, हिंदी, कन्नड)
Belgaum Varta Belgaum Varta