जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून कर्नाटक परिवहन मंडळाच्या बससह इतर दहाहून अधिक वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आलाअसून कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या हुबळी युनिटची बस आंदोलकांनी पेटवली. सदर बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली असून दरम्यान दगडफेकी झालेली आहे. आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री जवळ केएसआरटीसी बस आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बससह सहा गाड्या आंदोलकांनी पेटवून दिल्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला आणि कर्नाटक परिवहन बसवर दगडफेक करण्यात आली.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील शहागडमध्ये गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनात कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसला आग लावण्यात आली. सदर बसमध्ये 45 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणाच्याही जीविताला धोका निर्माण झालेला नाही. कर्नाटक परिवहन विभागाचे अधिकारी महाराष्ट्र पोलिसांच्या संपर्कात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta