Thursday , March 5 2026
Breaking News

उमेदवारी फसवणूक प्रकरण; चैत्रा टोळीकडून रोख रकमेसह ३.८ कोटींचे सोने जप्त

Spread the love

 

बंगळूर : भाजपची उमेदवारी देण्याचे अमिष दाखवून व्यापारी गोविंद पुजारी यांची फसवणूक करणाऱ्या चैत्रा कुंदापूर टोळीकडून सीसीबी पोलिसांनी रोख रक्कमेसह ३.८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे.
१२ सप्टेंबर रोजी, चैत्र कुंदापुर टोळीला उडुपी आणि चिक्कमंगळूर येथे अटक करण्यात आली, त्यांना न्यायालयात हजर केले गेले आणि सीसीबी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले. आरोपींच्या आर्थिक घडामोडींचे सर्व तपशील तपासण्यात येत आहेत.
आरोपींच्या बँक खात्यांचा शोध घेतला जात असून, व्यवहारांवर लक्ष ठेवले जात आहे. केवळ आरोपीच नाही तर त्यांचे जवळचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे बहुतांशी आर्थिक घडामोडी उघडकीस आल्या आहेत. तीन कोटी रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि ठेवींची प्रमाणपत्रे सापडली आहेत.
या फसवणुकीप्रकरणी चैत्र कुंदापूर, गगन कडुरू, धनराज, रमेश, प्रज्वल आणि बी. एल. चन्ननायक यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तिसरे आरोपी असलेल्या हालश्री स्वामी यांना अद्याप अटक झालेली नाही. प्रसाद बयंदूर या प्रकरणात अनुमोदक असण्याची शक्यता आहे.
जप्तीचा तपशील
चैत्रा कुंदापूर यांनी नातेवाइकांच्या नावे खासगी बँकेत १.८ कोटी रुपये ठेवले. ठेव प्रमाणपत्र जप्त केल्यानंतर सीसीबी पोलिसांनी गंगोळी येथील बँकेला भेट देऊन चौकशी केली.
चैत्राच्या घरातील सुमारे ६५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून ४० लाख रुपये तिचा मेहुणा व्यवस्थापक असलेल्या बँकेत ठेवण्यात आले आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथे सीसीबी पोलिसांनी फसवणूक करून खरेदी केलेली किया कार जप्त केली. चैत्राने बँकेत ठेवलेले पैसे आणि तिने खरेदी केलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
सोलापुरातील बार आणि रेस्टॉरंटसमोर उभी असलेली चैत्राची कार ९ सप्टेंबर रोजी किरण हा तिचा मित्र असल्याचे सांगत मुधोळ येथे घेऊन आला होता. किरणने सोलापूरला जाऊन एक किया कार आणून आपल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ठेवली. चैत्रा कुंदापूर, श्रीकांत, किरण यांचे कॉल सीसीबी पोलिसांनी ट्रेस केले. त्याआधारे किरणला ताब्यात घेऊन कार जप्त करून चौकशी करण्यात आली.
चैत्राचा जवळचा मित्र श्रीकांत नायक याच्या कुंदापूर येथील घरात ४५ लाख रुपये जप्त करण्यात आले, हालश्री स्वामीजींनी आधीच गोविंदा पुजारीला ५० लाख रुपये परत केले आहेत.
हे सर्व फसवणूकीचे पैसे आहेत हे स्पष्ट होत नाही. मात्र, ते या आरोपींच्या नावावर आणि घरात सापडले आहे, त्यामुळे याची दखल घेतली जाईल.
हालश्री स्वामींची गुंतवणूक
हालश्री स्वामीजींना दीड कोटी रुपये मिळाले. जमीन खरेदी करण्यासाठी, पेट्रोल पंप बसवण्यासाठी आणि कार खरेदी करण्यासाठी त्याने पैसे वापरले. अखेर गुन्हा दाखल होणार हे समजल्यावर त्यांनी पन्नास लाख रुपये गोविंदा पुजारी यांना परत दिले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *