Friday , December 12 2025
Breaking News

लोकसभा निवडणुकीत २० जागा जिंकण्याचे कॉंग्रेसचे लक्ष्य

Spread the love

 

मुख्यमंत्री बदलावर जाहीर वक्तव्यास मज्जाव

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निवासस्थानी उपहार बैठकीचे आयोजन केले होते. मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री बदलाच्या विषयावर चर्चा न करण्याच्या सक्त सूचना यावेळी मंत्री व आमदारांना दिल्याची माहिती सूत्रानी दिली.
परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, १९ मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि केंद्राकडून कोणतीही मदत न मिळण्याबाबत चर्चा केली. राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगून काँग्रेस हायकमांडने या विषयावर न बोलण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक बैठक बोलावली होती ज्यात १९ मंत्री उपस्थित होते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा व्हावी, हा उद्देश होता. सर्व चर्चा झाल्या. आमचे लक्ष्य २० जागा जिंकण्याचे आहे, असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा केल्याने निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत कोणताही संभ्रम नाही. विकासकामे सोडून काहीही बोलू नका, असे हायकमांडने म्हटले आहे. एआयसीसीचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत न बोलण्याचे निर्देश दिले असल्याने जाहीर वक्तव्ये करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुम्हीही (माध्यमांनी) असे प्रश्न विचारू नयेत. तुम्ही मला विकासाबाबतच विचारा, असे ते म्हणाले.
बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा झाल्ये सांगून रामलिंगा रेड्डी म्हणाले की, मंत्र्यांना त्याचा सामना करण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रावर काहीही केले नसल्याचा आरोप केला. दुष्काळ असूनही केंद्राचे लक्ष नाही. त्यातून एक पैसाही मंजूर झालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते (केंद्रीय मंत्री) मोठ्या संख्येने मते मागायला येत होते, पण आता आम्ही गंभीर संकटात असतानाही कोणी येत नाही, असेही ते म्हणाले.
पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांबद्दल ग्राउंड रिपोर्ट सादर करण्याच्या निर्देशाबाबत, देखील चर्चा झाली आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून सहा महिन्यांत निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आणि मंत्र्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या निवासस्थानी उपहार बैठकीचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या वागण्यावर नाराजी तर व्यक्त केलीच, शिवाय विधानांमधून पक्षाचा करिष्मा आणि लोकसभा निवडणुकीवर होणारा परिणाम याचीही माहिती दिली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

सिद्धरामय्या मंत्र्यांवर नाराज
काही मंत्री कार्यकर्त्यांना उपलब्ध नसल्याची तक्रार आली आहे. ही बाब हायकमांडच्या निदर्शनासही आली आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? हायकमांडने तुम्हाला आधीच काही जबाबदारी दिली होती. मात्र तुम्ही ती जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली नसल्याबद्दल हायकमांडने नाराजी व्यक्त केली, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मंत्र्याना बैठकीत सांगितले.

जाहीर वक्तव्य नको
कोणत्याही प्रकारचा असंतोष आणि गोंधळ असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर बोला. यावर जाहीरपणे बोलू नका, असे केपीसीसीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बैठकीत सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीत २० हून अधिक मतदारसंघ जिंकू, असे आश्वासन दिले आहे. त्यासाठी आता तुमच्या प्रयत्नांची गरज आहे. कोणत्याही कारणास्तव दुर्लक्ष करू नये यासाठी त्यांनी उपस्थित मंत्र्यांचा क्लास घेतला.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *