बेळगाव : शासनाने बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील पोलिस उपाधीक्षक आणि निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावला आहे. राज्यातील ४० उपाधीक्षक आणि ७१ पोलिस निरीक्षकांचा यात समावेश आहे. खानापूर येथील पोलिस ट्रेनिंग स्कूलचे उपअधीक्षक एस. डी. सत्यनायक यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी कर्नाटक लोकायुक्त विभागाचे उपअधीक्षक निलाप्पा ओलेकार यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे उपअधीक्षक वीरेश दोडमणी यांची सीआयडीमध्ये बदली झाली आहे,
तर पोलिस उपनिरीक्षकांमध्ये राज्य गुप्तवार्ताचे बसवराज लमाणी यांची बेळगाव जिल्हा विशेष पथकात (डीएसबी) नियुक्ती झाली आहे. रायबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक हसनसाब मुल्ला यांची खानापूर पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये बदली झाली होती, तर त्यांच्या जागी श्रीधर सतारे यांची यापूर्वी बदली झाली होती; मात्र ती रद्द करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक सतारे यांची खानापूर पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये बदली झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta