Sunday , September 8 2024
Breaking News

तीन वर्षात २५० हून अधिक बालकांची विक्री

Spread the love

 

तपासात माहिती समोर; सीसीबी पोलिसांकडून कसून चौकशी

बंगळूर : बालक विक्री नेटवर्कच्या अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याची धक्कादायक बाब सीसीबी पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. बालक विक्री नेटवर्कच्या आरोपींनी कर्नाटकात ५० ते ६० मुलांची विक्री केली, तर उर्वरित मुले तामिळनाडूला विकण्यात आली. चाचणीत त्यांनी गेल्या तीन वर्षांत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याचे सांगितले.
२५० हून अधिक मुलांची विक्री केल्याचे प्रकरण समोर आल्याने सीसीबी पोलिसांनी तपास तीव्र केला असून कर्नाटकात विकल्या गेलेल्या मुलांची माहिती आरोपींकडून गोळा करत आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे १० मुलांची माहिती मिळाली असून, उर्वरित मुले कुठे आणि कोणाला विकली गेली याचा तपास सुरू आहे.
एजंट बनली कोट्यधीश
महालक्ष्मी या नेटवर्कची कर्नाटक टोळीची म्होरक्या, चार-पाच वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात काम करत होती आणि गार्मेंट्समध्ये काम करत होती, पण आता ती मुलांच्या विक्रीच्या नेटवर्कमधून कोट्यधीश बनली आहे. २०१७ पासून हा व्यवसाय करणाऱ्या महालक्ष्मीकडे आज स्वतःचे घर, कार आणि भरपूर सोन्याचे दागिने आहेत. २०१५ ते २०१७ या कालावधीत ती केवळ आठ हजार पगारावर गारमेट्समध्ये काम करत होती. या वेळीच तिला भेटलेल्या एका महिलेने तिला अंडे दिले तर पैसे देउ असे सांगितले व ती या व्यवसायाकडे वळली.
अंडी विक्री
तिने त्यावेळी अंडी दिलेल्या महालक्ष्मीला सुमारे २० हजार दिले. तिला अंड्याचे दाता शोधून त्यांच्याकडून कमिशन मिळाल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपी २०२१ पासून सरोगसी एजंट, सरोगेट माता म्हणून काम करत आहेत. २०२१ नंतर गर्भपातासाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांचा त्यांनी शोध घेतला. याची माहिती जाणून घेतल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा गर्भपात करू नका, मूल होईपर्यंत आम्ही त्यांची काळजी घेऊ, प्रसूतीनंतर बाळ आमच्याकडे देण्यास त्यांचे मन वळवा, सर्व खर्च आमचा राहील. मुलीसाठी दोन लाख आणि मुलासाठी तीन लाख देण्याचा करार त्यांनी अशा गरोदर महिलांशी केला व मुलांना आठ ते १० लाखाला बाहेर विकले.
मुलाच्या जन्मानंतर, अटक केलेल्या व्यक्ती आईला कराराचे पैसे द्यायचे आणि मुलांचे फोटो त्यांच्या स्वत: च्या ग्रुपमध्ये शेअर करण्यास सांगायचे. जर एखाद्या मुलाची गरज असलेल्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला तर बालकाची किंमत लिंग आणि रंगावर आधारित निश्चित केली जाई. मुलीसाठी चार ते सहा लाख, मुलासाठी ८ ते १० लाखाला ते विकत होते. तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपींपैकी मुरुगेश्वरीने स्वतःचे मूल विकण्याची ऑफर दिली होती आणि जन्माचा दाखलाही दिला होता.

About Belgaum Varta

Check Also

मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारणच नाही

Spread the love  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; विरोधकांचा दावा फेटाळला बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *