Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

केंद्राकडून जाणीवपूर्वक एसडीआरएफ-एनडीआरएफबाबत संभ्रम

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या; निर्मला सितारामन खोटे बोलत असल्याचा आरोप बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर एसडीआरएफ-एनडीआरएफ बाबत जाणूनबुजून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप केला आहे, कारण कराचा पैसा आणि दुष्काळी मदत यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट्सची मालिका केली …

Read More »

भाजप कार्यकर्त्याकडून मराठा समाजाचा अपमान; कुमठा पोलिसात तक्रार दाखल

  कारवार : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या मराठा असल्याने त्यांना उद्देशून उत्तर कन्नडमध्ये मराठा पिडा कशाला आणला असा अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान कुमठा येथील भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एच. नायक यांनी कुमठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

11 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

  बेळगाव : 9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 9 मे रोजी सकाळी सात वाजता शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे होणार असून नऊ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधी व पूजन आरती करून सकाळी दहा वाजता शहापूर शिवाजी …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव सन् २०२४ सालाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे अध्यक्ष : दीपक अर्जुनराव दळवी उपाध्यक्ष : बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकरराव पाटील (मार्केट यार्ड), महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, महेश जुवेकर, रमाकांत …

Read More »

समाजातील शांतीसाठी मठ, मंदिरांची गरज

  राजू पोवार ; रासाई शेंडूरमध्ये दत्त मंदिराची वास्तुशांती निपाणी (वार्ता) : विज्ञानामुळे प्रगती होत असली तरी त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. सध्या युवा वर्ग व्यसनाधीन होत असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. सध्या मन:शांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. त्यासाठी युवकांनी अध्यात्माकडे वळावे, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार …

Read More »

पालकमंत्र्यांनी घेतली पाटील पिता-पुत्रांची भेट

  निपाणी (वार्ता) : बेळगांव ज़िल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोरगाव येथील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची रविवारी (ता.७) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील त्यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. जारकीहोळी यांच्या भेटीमुळे राजकीय गोटातून चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून निरंजन सरदेसाई म. ए. समितीचे उमेदवार!

  खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीच्या माध्यमातून समितीला पुन्हा नव्याने बळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यातून …

Read More »

सुवर्णसौधजवळ भीषण अपघात; शेतकऱ्याचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुवर्णसौधजवळील बस्तवाड गावच्या हद्दीत रविवारी झालेल्या भीषण अपघातात कोथिंबिरीची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मालवाहू वाहन आणि कोथिंबीर घेऊन जाणारा ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात बस्तवाड गावातील मल्लप्पा दोड्डकल्लन्नवर (४१) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बेळगावच्या बाजारपेठेत कोथिंबीर घेऊन जात असताना मागून आलेल्या मालवाहू वाहनाने ट्रॅक्टरला …

Read More »

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे तर कर्नाटक प्रांत अध्यक्षपदी स्वाती घोडेकर यांची निवड

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा नूतन अध्यक्षपदी श्री. विनायक मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कर्नाटक उत्तर प्रांत अध्यक्षपदी बेळगांव शाखेच्या सौ. स्वाती घोडेकर यांची सार्थ निवड करण्यात आली. बेळगाव शाखा सेक्रेटरी म्हणून श्री. के. व्ही. प्रभू व खजिनदार म्हणून श्री. डी. वाय. पाटील यांची निवड …

Read More »

मोहन कारेकर यांची जायंट्स विशेष समिती सदस्यपदी पुनर्निवड

  बेळगाव : बेळगावमध्ये जायंट्सची पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जागतिक स्तरावर काम करणाऱ्या जायंट्स इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या विशेष समिती सदस्यपदी २०२४ सालाकरिता पुन्हा एकदा निवड करण्यात आली. बेळगाव जायंट्स मध्ये त्यांनी अनेक पदे भूषविल्या नंतर गोवा कर्नाटक फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले त्यानंतर …

Read More »