Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : गव्हर्नमेंट मराठी मॉडेल शाळा येथे दि. 21/8/2024 रोजी येथे  क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत थ्रो-बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. रिलेमध्ये श्रीनाथ हलगेकर, श्रेयश चांगळी, सुशांत हलगेकर आणि कन्हैया तासीलदार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. योगा स्पर्धे मध्ये दुर्वा पाटील प्रथम, सोनाक्षी मुचंडी तृतीय आणि सुप्रिया पाटील हिने पाचवा क्रमांक आणि मुलांमध्ये श्रीओम धुळजी प्रथम तर श्रीनाथ हलगेकर हा द्वितीय क्रमांक पटकविला तर 200 मी धावण्याच्या स्पर्धेत सुशांत हलगेकर द्वितीय, तर 100 मी श्रीनाथ हलगेकर द्वितीय क्रमांक पटकाविला. लांब उडी मध्ये दुर्वा पाटील तृतीय. 80 मी अडथळा शर्यत मध्ये सोनाक्षी मुचंडी तृतीय पटकविला.
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आय. बी. राऊत, क्रीडा शिक्षक श्री. एम. एम. डोंबले, स्नेहल मजुकर, नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील, दिपा हट्टीकर,. तसेंच संस्थेचे, अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विद्यार्थी पालक व गावकऱ्यांच्या अभिनंदनास पात्र ठरले व पुढील तालुका पातळीवर स्पर्धासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *