बेळगाव : सर्वांना आस लागलीये ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची… नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला आणि सीमाभागातील प्रसिद्ध अशा ‘बेळगावच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी चव्हाट गल्ली बेळगाव येथे करतात एवढंच काय तर मोठमोठे राजकीय व उद्योगपती देखील बेळगावच्या राजाच्या दरबारात हजेरी लावतात. अशातच यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी …
Read More »तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती, 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, दोन जखमी
पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीत गॅस गळती झाल्याने चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेशुद्ध आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मासिटीकल कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे, तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर एफ 13 मध्ये …
Read More »वाहन मालकांना वाहतूक दंड भरण्यासाठी ५० टक्के सूट जाहीर
बंगळूर : राज्य सरकारने दंडाची थकबाकी असलेल्या वाहन मालकांना मोठी खूशखबर दिली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडाच्या भरपाईवर पुन्हा एकदा ५० टक्के सूट जाहीर केली आहे. यापूर्वी ५० टक्के सूट देऊन मोठ्या प्रमाणात दंड वसूल करणाऱ्या राज्य सरकारने आता आणखी एक सूट जाहीर केली आहे, ज्यामुळे वाहनचालकांना २३ …
Read More »वादग्रस्त गर्दी नियंत्रण विधेयक सभागृह समितीकडे; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला कांही तरतूदीना विरोध
बंगळूर : गेल्या ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारने सभागृहात सादर केलेले नियंत्रण विधेयक गुरुवारी सभागृह समितीकडे पाठविण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रस्तावित कायद्यामुळे निदर्शने कमी होतील आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर परिणाम होईल अशी चिंता व्यक्त केली. ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ११ जणांचा मृत्यू …
Read More »भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोडवर खड्ड्यात अडकून मिनी टेम्पो उलटला!
बेळगाव : बेळगाव शहरात रस्त्यांची दुर्दशा झाली असून, भाजी मार्केटमध्ये भाज्या घेऊन जाणारा एक मिनी टेम्पो उलटून अपघात घडला. या अपघातात महिला व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना अश्रू अनावर झाले. शहरातील भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोडवर एका खड्ड्यात अडकून मिनी टेम्पो उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली …
Read More »बेळगावमध्ये रिक्षा भाड्यावरून वाद, महिलांनी केली रिक्षाचालकाला मारहाण
बेळगाव : बेळगावातील डॉ. आंबेडकर रोडवरील जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षाच्या भाड्यावरून प्रवासी महिला आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याचा प्रकार घडला. मारहाण झालेल्या रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी कमी भाड्याबद्दल विचारले असता, महिलांनी शिवीगाळ केली. त्यांनी रिक्षाची चावी काढून घेतली आणि इतर …
Read More »प्राथमिक हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट
बेळगांव : टिळकवाडी येथील वॅक्सिंग डेपो मैदानावर स्वाध्याय विद्या मंदिर शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टरच अनगोळ, शहापूर, टिळकवाडी मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला. प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 8-3 असा पराभव केला, विजयी …
Read More »युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती
येळ्ळूर : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडिया बेळगावचे क्षेत्र प्रमुख श्री. राघवेंद्र बी एस, उप क्षेत्रप्रमुख श्री. मनीष मेघन्नावर, ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, माजी …
Read More »दुर्मिळ योग श्रावण शनी अमावास्या २३ ऑगस्ट
बेळगाव : श्रावण मास हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण मासातील शनी अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे.शनी देव या दिवशी आपल्या भक्तांना अभय देतो असा भविष्य पुराणात उल्लेख आहे. शनी अमावस्ये निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी श्री …
Read More »२५ ऑगस्ट रोजी प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव…
कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव जमखंडी जि. बागलकोट येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट प.पू. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta