रयत संघटनेचे आंदोलनाला यश ; राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली होती. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी …
Read More »निपाणीतील खराब सीडी वर्क ‘मॅनहोल’ ठरताहेत जीवघेणे
शहरातील विविध रस्त्यावरील परिस्थिती; लहान मोठे अपघात सुरूच निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी ‘मॅनहोल’ उघड्या अवस्थेसह खराब झाले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या उघड्या ‘मॅनहोल’च्या लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ‘मॅनहोल’ मध्ये पाणी साचल्यास किंवा अंधार …
Read More »एसआयआर प्रक्रियेत मराठी व समितीप्रेमी मतदारांनी आपले घर हाच आपला बूथ गाव, गल्ली हाच वॉर्ड म्हणून कार्यरत राहावे
धनंजय पाटील यांचे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आवाहन निवडणूक आयोगाने चालू केलेल्या एसआयआर (मतदार फेर निरीक्षण प्रक्रिया) अंतर्गत मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करणे व बोगस किंवा मृत व्यक्तींची नावे वगळणे यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून पडताळणी सुरू आहे. राष्ट्रीय पक्षाच्या बूथ एजंटांना यापूर्वी यांचे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती …
Read More »अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत
बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी मध्यरात्री मोठी दरड कोसळून प्रचंड शिळा रस्त्यावर आल्याने बेळगाव–सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक दरड कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर पडले. त्यामुळे मध्यरात्री काही काळ वाहतूक …
Read More »बळ्ळारी नाल्यामुळे पुराचा धोका; जलपर्णी-कचऱ्यामुळे हजारो एकर शेती धोक्यात!
बेळगाव : बळ्ळारी नाल्याला यंदा मोठा पूर आल्यास नाल्यातील जलपर्णी, गाळ आणि शहरी भागातून वाहून आलेला कचरा थेट शेतजमिनीत शिरून हजारो एकर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. शहापूर, वडगाव, अनगोळ, माधवपूर, जुने बेळगाव, हालगा …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात आज उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवार (८ जुलै) रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यासंदर्भात पुढील वाटचालीच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील …
Read More »मुसळधार पावसाचा इशारा; बेळगावसह सात जिल्ह्यांना रेड अलर्ट
बेळगाव : राज्यात मान्सूनचा जोर कायम असून, किनारपट्टी आणि मलेनाडू भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) बेळगावसह उडुपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, शिवमोग्गा, चिक्कमंगळूर आणि कोडगू या सात जिल्ह्यांसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०४.४ मिमीपेक्षा अधिक पावसाची …
Read More »हनिवेल शाळेला दुहेरी मुकूट; देवेंद्र जिंनगौडा, शांतिनिकेतन शाळेना विजेतेपद
बेळगाव : खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात हनिवेल स्कूलने दुहेरी मुकुट संपादन केले तर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल यांनी हि विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक …
Read More »शेतकरी कर्जमाफीचा सर्वंकष आढावा घेऊन निर्णय
मुख्यमंत्री शिवकुमार; दुष्काळी परिस्थितीची पाहणी करूनच घोषणा बंगळूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा सर्वंकष आढावा घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. तसेच दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतल्यानंतरच संबंधित भागांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गुलबर्गा विभागातील जिल्ह्यांच्या प्रगती आढावा …
Read More »मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी मधील शाळांना उद्या सुट्टी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व निपाणी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पीयूसी (बारावीपर्यंतच्या) महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta