Wednesday , August 19 2026
Breaking News

राज्य रँकिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंची चमकदार कामगिरी; ९ पदकांची कमाई

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी बंगळुरू आणि तुमकूर येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या रँकिंग स्केटिंग स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत राज्यभरातील २०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.

बेळगावच्या स्केटर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत ७ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ९ पदके पटकावली.

पदक विजेते स्केटर्स

हिरेन राज – १ सुवर्ण, १ कांस्य

मनन अंबिगा – १ कांस्य

रश्मीता अंबिगा – २ सुवर्ण

जय ध्यान राज – १ सुवर्ण, १ रौप्य

साईराज मेंडके – २ सुवर्ण

या स्केटर्सना केएलई सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे नियमित सरावाची संधी मिळत आहे. प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू सराव करत आहेत.

या यशासाठी खेळाडूंना पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

बेळगावच्या स्केटर्सनी राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनगोळमधील घरफोडीचा छडा; दोघांना अटक, २.४९ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Spread the love  बेळगाव : अनगोळ येथील शिवशक्तीनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *