Wednesday , August 19 2026
Breaking News

तंजावर साहित्य संमेलनासाठी नियोजन बैठकीचे आवाहन

Spread the love

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व शिवसंदेश भारत

बेळगाव : तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या संमेलनाच्या अनुषंगाने तंजावर येथे जाण्याचे नियोजन, प्रवास व्यवस्था, सहभागी सदस्यांची नोंदणी व इतर आवश्यक बाबींवर चर्चा करण्यासाठी बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ५.०० वा. यश ॲटो, कॉलेज रोड, बेळगाव येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य तसेच साहित्यप्रेमी बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील व जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी केले आहे.

चला, तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा गौरव वाढवूया!

About Belgaum Varta

Check Also

अनगोळमधील घरफोडीचा छडा; दोघांना अटक, २.४९ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Spread the love  बेळगाव : अनगोळ येथील शिवशक्तीनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *