बेळगाव : नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात 7 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मद्याची विक्री झाली आहे. तळीरामांनी कोट्यावधी रुपयांचे मद्य रिचवले असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात मद्याची विक्री झाली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अबकारी विभागाला उद्दिष्ट गाठता आले नाही. यंदा मद्यविक्रीचे उद्दिष्ट पार झाले आहे. …
Read More »पत्रकार वासुदेव चौगुले यांना आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार
खानापूर : माचीगड (ता. खानापूर) येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या वतीने झालेल्या 26 व्या मराठी साहित्य संमेलनात पत्रकारितेसाठी दिला जाणारा आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार दै. पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी आमदार दिगंबर पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, अकादमीचे …
Read More »खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संपन्न
खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील हत्तरवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. २०२३ चा कुस्ती आखाडा भरविण्यासाठी पुढील बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष माजी जि. पं. सदस्य लक्ष्मण बामणे, खजिनदार तानाजी कदम, माजी अध्यक्ष …
Read More »विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेची बैठक संपन्न
खानापूर : विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेची बैठक रविवार दि. 01/01/ 2023 रोजी जटगे येथे संपन्न. सभेची सुरुवात श्री गणेश नमन व नव वर्षाच्या शुभेच्छेने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गावचे ग्रा. पं. सदस्य सागर पाटील यांनी शाब्दिक रूपात केले. संघटनेचे लोंढा भाग प्रमुख श्रीकृष्ण खांडेकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या परिचयासह …
Read More »रामदास सूर्यवंशी यांचा प्रामाणिकपणा
सौंदलगा : सौंदलगा येथील रहिवासी रामदास सूर्यवंशी हे आपली पत्नी सुनीता सूर्यवंशी यांच्यासोबत युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढावयास गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढत असताना. एटीएममधून दहा हजार रुपये बाहेर आलेले सुनिता सूर्यवंशी यांना दिसले. त्यांनी आपले पती रामदास सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर …
Read More »भीमा कोरेगाव लढाईत संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला
प्रमोद हर्षवर्धन : कोगनोळी येथे शौर्य दिन उत्साहात संपन्न कोगनोळी : 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीकाठी भीमा कोरेगाव लढाई झाली. लढाई 500 शूरवीर विरुद्ध 28 हजार पेशवे यांच्यात झाली असून 500 शूरवीरांनी 28 हजार पेशव्यांचा पराभव करून छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृती कायद्याने केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही लढाई …
Read More »बैलहोंगलजवळ भीषण अपघात : दोघांचा मृत्यू
बेळगाव : सोमवारी रात्री बैलहोंगल-इंचळ रस्त्यावर झालेल्या दुचाकीस्वारांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे मुतवाड व व्हन्नूर येथील ग्रामस्थ असल्याची माहिती आहे. मात्र अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्रत्येकी दोन दुचाकींवर तीन जण स्वार होते. पोलीस …
Read More »कळसा- भांडुरा प्रकल्पासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात येणार
खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : कळसा- भांडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर म. ए. समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला कळसा- भांडुरा प्रकल्पाचे गाढे अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर हे उपस्थित होते. प्रा. केरकर यांनी म्हादई प्रकल्पाची माहिती समिती …
Read More »ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांचे निधन
विजयपुर : दुसरे विवेकानंद, चालणारे देव म्हणून ओळखले जाणारे विजयपुर जिल्ह्यातील ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी (वय 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. श्वसन आणि नाडीत चढ-उतार होत होते. सिद्धेश्वर स्वामीजींचा जन्म २४ ऑक्टोबर १९४१ रोजी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील …
Read More »पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ जिवंत बॉम्ब
चंदीगड : चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी (दि. २) घडलेल्या या घटनेने पोलिसांनी आजूबाजूचा सर्व परिसर सील केला. बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घर आणि हेलिपॅडजवळ आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे घरही याच परिसरात आहे. कंसल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta