खानापूर : विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेची बैठक रविवार दि. 01/01/ 2023 रोजी जटगे येथे संपन्न. सभेची सुरुवात श्री गणेश नमन व नव वर्षाच्या शुभेच्छेने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गावचे ग्रा. पं. सदस्य सागर पाटील यांनी शाब्दिक रूपात केले. संघटनेचे लोंढा भाग प्रमुख श्रीकृष्ण खांडेकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या परिचयासह मोजक्या शब्दात आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल साताप्पा देसाई माजी सैनिक हलशीवाडी यांनी संघटनेचे कार्य, उद्दिष्ट व समाजातील महत्त्व याचा सविस्तर उल्लेख करून सांगितले. महिला प्रमुख सौ. रामाक्का हनबर, शाळेचे शिक्षक, सागर पाटील व ज्येष्ठ नागरिक आदींची भाषणे झाली. बैठकीत उपस्थित मान्यवर व नागरिक यांच्यात विचारांची देवाण-घेवाण झाल्यानंतर ग्रामस्थांनी आगामी काळात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन एकमताने ठरविले.
सभेला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई, कृष्णा खांडेकर, रामाका हणबर, ग्रा. पं. सदस्य सागर पाटील, महादेव पाटील, तुकाराम पाटील, गुंडू लोटुलकर, दत्ता लोटुलकर, पुंडलिक पाटील, प्रतीक हलशीकर, शंकर मळीक, प्रदीप नंदोडकर, महाबळेश्वर पाटील, गुंडू सुतार, नंदू लोटुलकर, शाम हलशीकर, अनिल लोटुलकर, सह शाळेचे विद्यार्थी व महिला वर्ग उपस्थित होत्या. ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम सांगता करण्यात आली.