खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील हत्तरवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. २०२३ चा कुस्ती आखाडा भरविण्यासाठी पुढील बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष माजी जि. पं. सदस्य लक्ष्मण बामणे, खजिनदार तानाजी कदम, माजी अध्यक्ष डी. एम. भोसले गुरूजी, सुरेश पाटील, रामचंद्र खांबले, प्रवीण सुळकर, राजाराम गुरव, माजी कार्याध्यक्ष मोहीद्दीन दावणगिरी, अर्जुन जांबोटी, राष्ट्रपती आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे सेक्रेटरी रमेश पाटील यांनी केले, यावेळी कुस्ती प्रेमी यशवंत बिर्जे व कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष हणमंत गुरव, माजी जि. पं. सदस्य विशाल पाटील, राहुल सावंत, राजाराम पाटील कसबा नंदगड, मधू पैलवान कसबा नंदगड, रामचंद्र पाटील माजी चेअरमन एपीएमसी नंदगड, शंकर पाटील तोराळी, निंगाप्पा पाटील उचवडे, अर्जुन देसाई हलशीवाडी, अनंत पाटील सागरे, कॅप्टन चांगाप्पा पाटील शिओली, गजानन गुरव मणतुर्गे, सतीश पाटील मणतुर्गे, विठ्ठल कोलेकर कौंदल, पुंडलीक कोलेकर, नारायण झुंजवाडकर होनकल, मल्लाप्पा चौगुले गणेबैल, साताप्पा गोरे गर्लगुंजी, लक्ष्मण पाटील कौंदल, परशराम पाटील खानापूर, रामा चिनवाल खानापूर, नागाप्पा पाटील उचवडे, लक्ष्मण झांजरे बैलूर, नारायण कालमणकर देवाचीहट्टी इत्यादी बहूसंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणानंतर आभार प्रदर्शन निवृत्ती पाटील भंडरगाळी यांनी मानले.