विधिमंडळ अधिवेशन सुरू बंगळूर : ‘अमृत काळा’च्या पुढील २५ वर्षांसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य सरकार सर्वसमावेशक विकासाच्या मॉडेलचे अनुसरण करत असल्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले. शुक्रवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. यावेळी गेहलोत यांनी विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत विधानसौदाच्या भव्य पायऱ्यांनी विधिमंडळात …
Read More »महानगरपालिकेमध्ये पुन्हा मराठी भाषेला छेद!
बेळगाव : बेळगाव प्रशासनाला नेहमीच मराठी भाषेचा त्रास होत असतो. तर दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या की लोकप्रतिनिधींना मराठीची जाग येते. याचा अनुभव अनेक वेळा बेळगावकरांना आलेला आहे. महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिकेमधील महापौर- उपमहापौर कक्षा बाहेर असलेल्या फलकावरून जाणीवपूर्वक मराठीला वगळल्याचे निदर्शनात आले आहे. …
Read More »डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील गणपती मंदिराचे उद्घाटन
खानापूर : डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या गणपती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल बारा वर्षानंतर माऊली यात्रा भरविण्यात अली आहे. दर बारा वर्षांनी माऊली भगिनींच्या भेटीचा सोहळा पार पडतो. मालप्रभा आणि म्हादाई नदीचे उगमस्थान रामेश्वर मंदिराजवळ आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रथम …
Read More »खानापूर समितीकडे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज समितीकडे शक्तिप्रदर्शनाने सुपूर्द केला. म. ए. समिती इच्छुक उमेदवारांकडून 51 हजार रुपये अनामत रक्कम भरून अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार आबासाहेब …
Read More »येळ्ळूर साहित्य संघाच्या वतीने आयोजित कथाकथन स्पर्धेत समृद्धी पाटील व अनुजा लोहार प्रथम
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने कै. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे यांच्या स्मरणार्थ आयोजित कथाकथन स्पर्धेत कुमारी समृद्धी गणपती पाटील व कुमारी अनुजा दत्तात्रय लोहार यांनी प्रथम क्रमांक मिळविले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने शुक्रवार (ता 10) रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात सदर कथाकथन स्पर्धा घेण्यात …
Read More »खानापूर तालुका म. ए. समिती माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णाना फळ वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : कुसमळी (ता. खानापूर) तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष, जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी दि. १० रोजी खानापूर सरकारी दवाखान्यातील रुग्णाना फळे वाटून करण्यात आला यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष …
Read More »डीएफओ व्यंकटेश यांच्यावर लोकायुक्त छापा
बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेंगलोर, रामनगर आणि कोलारमध्ये एकाच वेळी छापे मारले. बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी कोलार डीएफओ व्यंकटेश यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कोलार क्लॉक टॉवर जवळील विजयनगर, रामनगर, बेंगलोर येथील कोलार सोशल फॉरेस्ट ऑफिसर डीएफओ व्यंकटेश यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकला आणि कागदपत्रांची तपासणी …
Read More »खानापूर समितीकडे गोपाळ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे. अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत आहे. गोपाळ पाटील …
Read More »रखडलेल्या गटार कामांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकासकामे सुरू आहेत.विकास कामांना चालना मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच काही ठिकाणी अर्धवट राहिलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना नव्या त्रासाला तोंड देण्याची वेळ आली आहे. असा प्रकार राम कॉलनी आदर्श नगर परिसरातील गटार बांधणी कामात …
Read More »कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द
कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण निश्चितपणे कायमस्वरुपी काढणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta