बेळगाव : मुळचे रयत गल्ली आणि सध्या बिर्जे मळा, जुने बेळगाव येथील रहिवासी गंगाधर (बाळू) परशराम बिर्जे यांचे सोमवारी (ता. ४) निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. श्री. बिर्जे वडगाव प्राथमिक कृषी पतसंस्थेचे माजी चेअरमन होते तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य केले होते. बहुआयामी व्यक्तीमत्व …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने गेल्या सात वर्षांपासून श्रावण मासानिमित्त संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यंदाचे हे आठवे वर्ष आहे. यंदाची स्पर्धा रविवार दि. १७ ते मंगळवार १९ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत मराठा मंदिराचे सभागृह, खानापूर रोड, गोवावेस, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ, बेळगाव येथे …
Read More »बेळगावात ‘आप’चे आंदोलन; रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले. सोमवारी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिका आवारात निदर्शने केली. पावसामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. सध्या बेळगावातील रस्त्यांवर …
Read More »कन्नडसक्ती कदापी खपवून घेणार नाही; शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : कर्नाटक सरकारने सीमाभागात चालू केलेल्या कन्नडसक्तीच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या भव्य मोर्चाला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस मालोजी अष्टेकर हे होते. कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र केली आहे. सरकारी …
Read More »युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : शेतकऱ्यांना बाजारात युरिया खत मिळत नसल्याने आणि खत विक्रेते दुप्पट दराने त्याची विक्री करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडत असून भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सोमवारी बेळगाव शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेळेवर …
Read More »कन्नडसक्ती मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे : आमदार विठ्ठल हलगेकर यांना युवा समिती सीमाभागच्या वतीने निवेदन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम शेळके यांना कन्नडसक्ती त्वरित मागे घ्यावी यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत आशा आशायचे निवेदन सादर केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या भेटीत कन्नडसक्ती करण्यात येत असल्याने मराठी …
Read More »कन्नडसक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे; तालुक म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेच्या मूलभूत अधिकारांवर कर्नाटक सरकारकडून गदा आणली जात आहे. मराठी भाषेला हद्दपार करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची गरज आहे. या विरोधात येत्या ११ तारखेला काढण्यात येणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चात हजारो मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ता. म. ए. समितीचे अध्यक्ष, माजी …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘त्या’ वृद्धाची निराधार केंद्रात रवानगी
बेळगाव : कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडलेल्या एका असहाय्य वृद्धाची समाजसेविका माधुरी जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने निराधार केंद्रात रवानगी करण्यात आली. रमेश देशपांडे (वय ७७) असे त्या वृद्धाचे नाव आहे. गेल्या पाच – सहा दिवसांपासून हा वृद्ध बेळगाव शिवाजी कॉलनीत भटकत होता. सदर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते पवन कांबळे, संतोष …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका व युवा समिती निपाणी यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मराठी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वाळकी, अंमलझरी, पटनकोडी, यमगरणी, बुदीहाल, कोडनी, गायकवाडी या शाळेमध्ये वाटप केले. …
Read More »डी एम एस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डी एम एस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्प्रवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कर्यक्रमाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta