Tuesday , March 18 2025
Breaking News

Belgaum Varta

’खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली!

निपाणी पोलिसांनी केली कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर मात : व्यायामावर केले लक्ष केंद्रित निपाणी : योग्य नियोजनामुळे निपाणी पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. परिणामी, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकाही पोलिसाला प्राण गमवावे लागले नाहीत. यावरून पहिल्या लाटेनंतर आलेल्या अनुभवातून घेतलेल्या खबरदारीमुळे पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती बर्‍या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. निपाणी …

Read More »

कृषी सुधारणा कायद्यांविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून काळा दिन

बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्याहीताच्या आड येणारे कृषी सुधारणा …

Read More »

बुध्दपोर्णिमा : कोरोना संकटात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : बुध्दपोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, कोरोना संकट काळात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार आहे. निसर्गाचा आदर करणं, ही बुध्दांनी दिलेली शिकवण महत्वाची आहे. बुध्दांची तत्वे दीपस्तंभासारखे आहेत. कोरोनामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आज संपूर्ण देश संकटात आहे. या काळामध्‍ये …

Read More »

बंद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करा : खानापूर युवा समिती

बेळगाव : खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली, माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे तहसीलदार रेश्मा …

Read More »

लॉकडाउन शिथील झाल्याने कोवाड बाजारपेठेत गर्दी

कोवाड : जिल्ह्यातील लॉकडाउन रविवारी रात्री शिथील झाल्याने कोवाड बाजारपेठेत सोमवारपासून पुन्हा गर्दी उसळली आहे. लॉकडाउन काळात बंद असणारी दुकानेही खुली होत असल्याने लोकांची गर्दी होत आहे. ग्रामपंचायतीकडून नियमांचा भंग करणार्‍यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी बाजारपेठेत होणारी गर्दी चिंताजनक झाली आहे. प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. सकाळच्या …

Read More »

फुल उत्पादक-व्यापारी संकटात : उद्यापासून मार्केट बंद

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारनेजारी केलेल्या लॉकडाउनमुळे बेळगावात फुलउत्पादकांना व विक्रेत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरेजावे लागत आहे. विक्रीस आणलेली फुले रस्त्यावरओतून देऊन रिकाम्या हाती घरी परतण्याची वेळत्यांच्यावर आली आहे. व्यापार नसल्याने उद्यापासूनफुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे बेळगाव होलसेल फुलमार्केट ओस पडले आहे. बाजारात आणलेली फुले ग्राहकांअभावी तशीच पडून रहात असल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. लॉकडाउनमुळे लग्नसोहळे व अन्य समारंभांना बंदी आहे तर देव गाभाऱ्यात अन मंदिरे बंद अशी स्थिती आहे. त्यामुळे फुलांना मागणी नाही. परिणामी फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना संकटात …

Read More »

सामाजिक जाणिवेतून कोरोना योद्ध्यांना किट

उत्तम पाटील : निपाणी मतदार संघात १५०० जणांना वाटप निपाणी : दोन महिन्यापासून निपाणीसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या काळात अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत, नगरपालिका कर्मचारी, वैद्यकीय मंडळी, पत्रकार जीवावर बेतून काम करत आहेत. या कोरोना योद्ध्यांची दखल घेऊन बोरगाव अरिहंत परिवाराचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक …

Read More »

राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन संपणार की, वाढणार?

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार …

Read More »

श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन

खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महालक्ष्मी सौंसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने शांतिनिकेतनमध्ये कोरोना केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ मे रोजी अवरोली माठादिष श्री चन्नबसव देवरू व रामदासजी महाराज तोपिनकट्टी यांच्या सानिध्यात झाले. अध्यक्षस्थानी विठ्ठल …

Read More »

बेळगाव जिल्हा रुग्णालयात आता पोलिस तैनात

बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात (बिम्स) कोरोना रुग्णासोबत येणाऱ्या इतरांना / अटेंडरना आत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरीही संबंधीत या आदेशाला जुमानत नसल्याने रविवारपासून जिल्हा रुग्णालयातील विविध विभागात पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसोबत त्यांची देखभाल करण्यासाठी आलेल्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याने संबंधितांना आपत्कालीन विभाग, मेडिकल वार्ड आणि …

Read More »