Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा

नवी दिल्ली :  विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याची घोषणा शरद पवार यांनी केली. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार …

Read More »

कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशीसंदर्भात खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा

खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे उद्या रास्तारोको करण्याचा निर्धार खानापूर : रविवार दिनांक 17-7-2022 रोजी दुपारी 12 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. यावेळी 6 जुलै 2022 रोजी कस्तुरीरंगन आयोगाने खानापूर तालुक्यातील 60 गावे …

Read More »

आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच

  आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव …

Read More »

आगामी निवडणुकीत विकासकामेच ठरणार काँग्रेससाठी वरदान : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

कुडची : मागील काळात काँग्रेस सरकारने सुशासन देण्याबरोबरच अनेक विकासकामे केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही विकासकामे वरदान ठरणार आहेत, असे मत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कुडची विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व पक्ष संघटनेच्या हितासाठी 6 दिवस आयोजित भव्य सायकल जथ्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे …

Read More »

गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा; संभाजीराजेंची मागणी

  कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. …

Read More »

अन्नपुर्णेश्वरी नगर येथे पावसाच्या पाण्यामुळे बेघर!

  बेळगाव : बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. वडगाव परिसरात देखील अनेक ठिकाणी पाणी घरात शिरून बरेच नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती वडगाव अन्नपुर्णेश्वरी नगर 6 क्रॉस येथे सुद्धा विष्णू दत्ताराम दरेकर यांची झाली आहे. घरातील छप्पर गळत असून घरचा परिसर पाण्याने …

Read More »

ओमनगरमध्ये पावसाच्या पाण्याने रहिवाशी चिंतेत

  बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही वसाहती पाण्याखाली गेल्या असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या तीव्र होऊनही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुसळधार पावसाने बेळगावातील जनता अक्षरश: हैराण झाली आहे. …

Read More »

बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

  बेळगाव : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या स्वच्छ विद्यालय अभियानात सहभागी झालेल्या बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छ भारत अभियानात सर्व शाळांचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याची संधी दिली होती. त्यात बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलचाही सहभाग होता. शिंदोळी …

Read More »

कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर

  बेळगाव : महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील कोकण भागात वरुणराजाने कहर केला आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्या, वेदगंगा व दूधगंगा नद्यांना पूर आला होता. परंतु कालपासून महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी …

Read More »

देसूर क्रॉसजवळ लॉरी-दुचाकी धडक : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

बेळगाव : दुचाकी आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील देसूर क्रॉसजवळ घडली. गजपती गावातील अक्षय हिरेमठ याचा मृत्यू झाला. आणखी एक नागय्या हिरेमठची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  बेळगाव ग्रामीण पाेलिस ठाण्यात ही …

Read More »