संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील सौ. लक्ष्मीबाई बाबू कासारकर यांच्या निवासस्थानी श्री रेणुकादेवी (आंबील) महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सुभाष कासारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीची पूजा करून महाप्रसादाचे पूजन केले. श्रींच्या हस्ते प्रसाद पूजनानंतर महाप्रसाद वाटप …
Read More »खानापूर तालुक्याच्या हेस्काॅम खात्यात १८२ जागा रिक्त
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वायरमनच्या जागा न भरल्याने हेस्काॅम खात्यात १८२ वायरमनच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करताना हेस्काॅम खात्याला तारेवरची कसरत करावीशी लागते. नुकताच झालेल्या वादळी पाऊसाने तालुक्यातील जंगल भागातील खेड्यात …
Read More »संकेश्वरात मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमाला “नो पब्लिसिटी”
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील साईनाथ चित्रपटगृहाजवळच्या ओढ्यावरील ब्रिज (पूल) निर्माण कार्याचा नारळ राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी फोडला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पूल निर्माण आणि तेथील २४ मिटर रस्ता रुंदीकरण कामासाठी ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंत्री उमेश कत्तीं संकेश्वरच्या सर्वांगिण …
Read More »सिंगीनकोपात ग्रामदैवत कलमेश्वर यात्रेची सांगता
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. ५ रोजी ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रा सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. सालाबादप्रमाणे यंदाही श्री कलमेश्वर यात्रेला सोमवारी दि. ४ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी गावातील विविध देवदेवताची विधावत पुजा, अभिषेक करण्यात आले. दुपारी २ वाजता करडी मजल व भजनाच्या नादात गावातुन देवीची …
Read More »माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडे
वेदांत सखी ग्रुपच्या महिला दिन कार्यक्रमात अनुजा रजपुत यांचे प्रतिपादन बेळगाव : आपल्या कुटुंबासाठी सर्व स्त्रिया कष्ट घेत असतात. कौटुंबिक कामाबरोबरच छंदही जोपासतात. इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची भावना बरेच काही चांगले कार्य करून जात असते. अशाच इच्छेतून मी समुद्रसपाटीपासून 5864 मीटर उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर झालेला आनंद …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणप्रेरणेतून विद्यार्थ्यांनी उन्नती साधावी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र प्रचंड प्रेरणादायी आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजचे आपले अस्तित्व आहे, याचे भान राखून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्मरण करावे आणि त्यांच्या प्रेरणेतून स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभात …
Read More »संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीकडून मोठा दणका बसला आहे. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केले आहेत. संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईची पुर्वकल्पना होती, असे विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. …
Read More »ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकता हेच तनिष्कचे यश : संदीप कुलहळी यांची माहिती
बेळगाव : गेल्या सहा वर्ष बेळगावच्या चोखंदळ ग्राहकांनी तनिष्कच्या दागिन्यांना भरघोस प्रतिसाद दिला. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हेच तनिष्कच्या यशाचे गमक असल्याची माहिती टाटा समूहाच्या कॅरेटलेन बोर्डाचे सदस्य संदीप कुलहळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संतोष चांडक संचालित टाटा सुमुहातील तनिष्कच्या बेळगाव खानापूर रोड टिळकवाडी कृष्णाई आर्केड येथील नव्या भव्य …
Read More »बेळगावसह 3 ठिकाणी खत प्रकल्प : मंत्री मुरुगेश निराणी
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चून खत उद्योग सुरू करण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी दावणगिरी, बेळगाव आणि मंगळूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे, अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी ही माहिती दिली. मंगळूर येथे काल सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री …
Read More »रणकुंडये खून प्रकरणी चार जणांना अटक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील रणकुंडये खून प्रकरणाचा तिढा सोडवण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील नागेश पाटील (वय 31) या युवकाचे घरातून अपहरण करून धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी आरोपी असलेला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta