Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे डॉ. अथर्व गोंधळी याचा एम.व्ही.एल.ए. प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ. अथर्व संदीप गोंधळी यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे ‘एम. व्ही.एल.ए. प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे सानीपिना राव विशाखापटनम यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान …

Read More »

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक

राज्याध्यक्ष सीमाकवी रवी पाटील उपस्थित राहणार बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्हा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदची उद्या बुधवार दि. 23 मार्च रोजी पुरुष व महिला कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे. पहिले राज्यस्तरिय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२० रोजी मराठा मंदिर येथे भरविण्यात आले. त्यानंतर लॉकडऊन सुरु झाले. सन २०२१ ला …

Read More »

‘शिवजयंती’ राष्ट्रीय सण म्हणून बेळगावात साजरी झाली पाहिजे : किरण जाधव

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात तिथीप्रमाणे जन्मसोहळा साजरा झाला. सकल मराठा समाज्याचे किरण जाधव, रमाकांत कोंडूसकर, सुनील जाधव, रणजित पाटील, दत्ता जाधव, जयराज हलगेकर, सागर पाटील, महादेव पाटील शिवाजी उद्यानात शिवरायांच्या जन्मसोहळ्याला उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवाजी उद्यानाला फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीसंदर्भात 24 रोजी बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची एकी करण्यासंदर्भात पंचसदस्यीय कमिटीच्या वतीने बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांच्या प्रमुखांना लेखी पत्राद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. सदर बैठक गुरुवार दि. 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. 2018 …

Read More »

शहापूरात साजरी पर्यावरणपूरक रंगपंचमी

बेळगाव : कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शासनाच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कार्नर येथे प्रदूषणमुक्त रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली.रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी यांनी रंगपंचमीचा आनंद सुटला. कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री. मालोजी अष्टेकर यांनी …

Read More »

रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

  बेळगाव : भवानीनगर येथे गेल्या 15 मार्च रोजी घडलेल्या राजू दोड्डबोम्मण्णावर या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मयत राजूच्या पत्नीसह त्याच्या दोघा व्यवसायिक भागीदारांना अटक केली आहे. पत्नीनेच 10 लाखाची सुपारी देऊन राजू याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. …

Read More »

खानापूर तालुक्यातील ग्रा. पं. कडून मिळाणाऱ्या घरासंदर्भात ता. पं. ला निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतमधून १६३० घरे मंजुर करून तालुक्याच्या आमदारानी १० घरे प्रत्येक ग्राम पंचायतीला आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावे घर मंजुरीसाठी दिली आहे. हा ग्राम पंचायत सदस्यावर अन्याय आहे. तेव्हा तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्याना विश्वासात घेऊन संबंधित ग्राम पंचायतीच्या पीडिओ अधिकाऱ्यानी आमदार …

Read More »

काजू उत्पादक शेतकऱ्यांची अडकुर येथे बैठक संपन्न

चंदगड : अडकुर येथील रवळनाथ मंदिरात काजू हंगाम सन 2022 च्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मागील दोन वर्षांत बळीराजा काजू समितीने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन सन 2022 च्या चालु हंगामातील काजू आंदोलनाचे नियोजन ठरवण्यात आले. लाॅकडाऊनच्या दोन वर्षांच्या कालखंडात बळीराजा काजू संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी संयम …

Read More »

हेल्प फॉर निडी फाऊंडेशनला रोटरी क्लब वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे रुग्णवाहिका

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी या सेवाभावी शाखेला रोटरी क्लब वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे एक रुग्णवाहिका देणगीदाखल देण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली हेल्प फाॅर नीडी शाखेला एक रुग्णवाहिका …

Read More »

संगीतप्रेमी रमेश कत्ती…

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती हे यल्लीमन्नीळी येथील मुस्लिम समाजाच्या एका विवाह समारंभात सहभागी झाले होते.विवाह समारंभात दुल्हन बिदाई प्रसंगी बाबुलकी दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले या गीताची धून सुरु करताच रमेश कत्ती त्या गाण्यात तल्लीन होऊन गेले. त्यांनी …

Read More »