Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

जमिनीची कागदपत्रे थेट शेतकऱ्यांच्या घरात

पालकमंत्र्यांच्या हस्ते धामणे गावात योजनेला प्रारंभ बेळगाव : देशात प्रथमच कर्नाटकात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते शेतकऱ्यांच्या घरात थेट कागदपत्रे देण्याच्या अभिनव योजनेला सुरुवात करण्यात आली असून या योजने अंतर्गत बेळगावमधील धामणे या गावात जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते चालना देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या …

Read More »

श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ

बेळगाव : श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेस जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाले. श्री मंगाई देवी युवक मंडळाने फुलांचा वर्षाव करत सर्व महिलांचा स्वागत सत्कार केला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले समाजसेवक अभिषेक कलघटगी, निकिता कलघटगी, समाजसेविका …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

बेळगाव : दि. १२/०३/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३४ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू …

Read More »

हदनाळ येथे महिलेचा विहिरीत पडून मृत्यू

कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथे विहिरीत पाय घसरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 11 रोजी घडली. सुनिता शिवाजी पाटील (वय 38) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सुनिता या शेतात भांगलण कामासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरले असता त्यांचा पाय घसरल्याने पाण्यात …

Read More »

येळ्ळूर संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर

बेळगाव : येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी वाढदिवस आणि महाराष्ट्र कुस्ती मैदान असा संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम निश्चित करून जाहीर करण्यात आला. येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. विश्वस्त मंडळाचे …

Read More »

शहरासह ग्रामीण भागात उद्या वीज खंडित

बेळगाव : हेस्कॉमकडून बेळगाव तालुक्यामध्ये तातडीची दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली असल्यामुळे रविवार दि. 13 मार्च रोजी बेळगाव शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील कांही भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. वडगाव विभाग वीज पुरवठा केंद्राच्या व्याप्तीतील धामणे, कुरहट्टी, मासगोनहट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंस गड, देसुर, नंदिहळ्ळी, कोंडस्कोप, हलगा, …

Read More »

चिमुकल्यांनी केले पर्यावरण प्रदूषणाचे प्रबोधन

प्लास्टिक टाळा देश वाचवा : ’अंकुरम’ शाळेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अनेक सोयी-सुविधा घरबसल्या मिळत आहेत. त्याप्रमाणे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडून प्रदूषण वाढत आहे. याशिवाय वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते अपघातही दररोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीनगरमधील अंकुरण इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी …

Read More »

कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

कोगनोळी : कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गणेश कॉलनी ते भगवा रक्षक चौक पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले. कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी  स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या …

Read More »

विकास कामामुळे दलित समाजाची प्रगती

नगरसेवक दिगंबर कांबळे : उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील तसेच अरिहंत उद्योग समूह यांच्याकडून शहरातील दलित समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शुद्ध पाणी घटकची निर्मिती केली आहे. युवकांना व्यायामाची …

Read More »

यमगर्णीजवळ अपघात : वाहनांचे मोठे नुकसान

एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले …

Read More »