Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटक प्रवेश आरटीपीसीआर सक्ती रद्द

पोलिस बंदोबस्त कायम कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती कर्नाटक शासनाने रद्द केली असून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आता फक्त कोरोना दोन डोस घेतलेला दाखला दाखवून प्रवेश मिळणार आहे. कर्नाटक शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा …

Read More »

शेतकऱ्यांबरोबर चर्चेसाठी अधिकारीच गैरहजर 

रयत संघटना आक्रमक: आंदोलन छेडण्याचा इशारा निपाणी (वार्ता) : रयत संघटनेच्या माध्यमातून कोगनोळी टोल नाका येथील पिडित शेतकरी बंधू व किरकोळ विक्रेते यांनी अधिकाऱ्यांना सर्वे बंद करण्यास भाग पाडले होते. सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केल्याशिवाय पुढील निर्णय घेतला जाणार नाही असे ठरले होते. परंतु अचानक  सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन …

Read More »

बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

मुंबई : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पाच दशके बजाज समुहाचे नेतृत्व केले. त्‍यांनी 50 वर्षे कंपनीचे अध्यक्षपदही सांभाळले होते. 2001 मध्ये त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल …

Read More »

कुंकळ्ळीत तृणमूल, भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार

कुंकळ्ळीत तृणमूल, भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार कुंकळ्ळीतील सर्व जाहीरसभा खचाखच   कुंकळ्ळी: कुंकळ्ळी मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप, तृणमूल व काँग्रेस पक्षाने जोर लावला आहे. प्रचार संपुष्टात येण्याला अवघे काहीच तास उरले असताना शुक्रवारी भाजप, तृणमूल व कॉंग्रेस पक्षाने जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ‘हम भी कुछ कम नहीं’ असे …

Read More »

खानापूर तालुक्यातील गोमारी तलाव शेतकरी वर्गाला वरदान

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात गोमारी तलाव गेल्या ७० वर्षापूर्वी उभारण्यात आला. गोमारी तलाव तालुक्यात आकाराने मोठा आहे. शिवाय गोमारी तलावाची प्रसिद्धी मोठी आहे या तलावला जोडलेल्या गस्टोळी कॅनल नुकताच कोसळला. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतीला होणार पाणी पुरवठा बंद झाला आहे. गोमारी तलाव हा …

Read More »

असोगा रेल्वेगेट १० दिवसासाठी बंद राहणार, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या बेळगाव-लोंढा रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे असोगा खानापूर मार्गावरील येणाऱ्या रेल्वे गेटचे काम शनिवारपासुन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या रेल्वेगेटवरून वाहतुक करणे शक्य नाही. यासाठी असोगा भागातुन खानापूरला येणाऱ्या वाहनधारकांना तसेच नागरिकांना रेल्वे खात्याकडुन आसोगा खानापूर रेल्वे गेट येत्या १० दिवसासाठी बंद …

Read More »

टीपी, झेडपी निवडणुकीत केवळ एससी, एसटीना आरक्षण ‘सर्वोच्च’ आदेश

ओबीसी रहाणार वंचित? निवडणुका लांबणीवर शक्य बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीलाच (एसटी) आरक्षण मिळणार असल्याचे सांगून यावेळी इतर मागसवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण मिळणार नसल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी प्रसार माध्यमाना दिली …

Read More »

हर-हर महादेवाच्या गजरात रथोत्सव

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्री शंकराचार्य संस्थान मठाची श्री शंकरलिंग रथोत्सव महायात्रा मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडली. आज दुपारी ३:४५ वाजता रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथ श्री नारायण बनशंकरी मंदिराकडून मिरवणुकीने स्वस्थानी श्री शंकराचार्य संस्थान मठाकडे लाकडी थरप लावून हर-हर महादेवाच्या …

Read More »

ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला

माणगांव (नरेश पाटील) : ज्ञानदेव पवार यांनी गुरुवार दि. 10 रोजी नगराध्यक्ष पदावर विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणगांव नगरपंचायतीत जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले. त्यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगार उपस्थित होते. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांना पुष्पगुच्छ …

Read More »

कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी

बेळगाव : दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व सुवर्ण लक्ष्मी को ऑप क्रेडिट सोसायटी ली. यांच्या संयुक्त विद्यमानाने सोसायटीच्या सभागृहात कै. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांची 219 वी जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर तसेच प्रमुख पाहुणे प्रदीप अर्कसाली, संस्थेचे संस्थापक मोहन कारेकर, व्हाईस चेअरमन …

Read More »