Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

”त्या मृत माकडावर” सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

बेळगाव : बेळगावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या माकडावर सामाजिक कार्यकर्त्यांनी शहापूर स्मशानानजिक अंत्यसंस्कार केले. आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर हल्ला करून त्याला मारून टाकले. या भागातील काही नागरिकांनी ही घटना महापालिका सफाई कामगारांना कळवून मेलेल्या माकडाला कचरा गाडीतून नेण्याची विनंती केली. मात्र कचरा …

Read More »

भारतासाठी आज ‘करो या मरो’ची स्थिती!

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा टी 20 सामना आज (14 जून) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे. अशा परिस्थितीत …

Read More »

हमारा देश संघटनेतर्फे निदर्शने

बेळगाव : बेळगावातील फोर्ट रोडवर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर टांगणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी हमारा देश संघटनेने केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानकारक विधान केल्याचा आरोप करून त्यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती …

Read More »

कावेरी प्रकरणी आम्हाला न्याय मिळेल : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुर : कावेरीच्या पाणी वाटपावरून तमिळनाडू काही तरी कुरापत काढून राजकीय स्टंट करत आहे. मात्र मेकेदाटू योजनेला कसलाही कायदेशीर अडथळा नाही, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, मेकेदाटू योजनेसंदर्भात कावेरी नदी देखरेख मंडळाकडे डीपीआर मंजुरीसाठी अनेक बैठक झाल्या आहेत. …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकर्‍यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

शरद पवार राष्ट्रपती पदासाठी योग्य : संजय राऊत

उत्तम प्रशासक हवा की रबर स्टॅम्प हे भाजपवर अवलंबून मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाबाबत वक्तव्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अनुभव राष्ट्रपती पदासाठी योग्य आहे, असं म्हटलं आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं की, ’देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत, …

Read More »

टी-20 विश्वचषकासाठी दिनेश कार्तिक अनफिट?

गौतम गंभीरच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष नवी दिल्ली : भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळवलं. दरम्यान, आयपीएलमधील दिनेश कार्तिकच्या आयपीएलमधील कामगिरीचं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतूक केलं होतं. बंगळुरूच्या संघात फिनिशरची भूमिका बजावणार्‍या दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियात होणार्‍या …

Read More »

मोकाट कुत्र्यांनी पाडविला वानराचा फडशा : भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची शिवसेनेची मागणी

बेळगाव : मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने एका वानरावर हल्ला करून त्या वानराला अक्षरशः फाडून खाल्ले. आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी येथे असणाऱ्या उद्याना नजीक भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला आणि त्या वानराच्या छाती आणि पोटाकडील भागाचे लचके तोडले. याआधीही बेळगाव शहर, उपनगरं आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी गाई-बकरी यावरच नव्हे …

Read More »

आज पुन्हा राहुल गांधींची ईडी चौकशी; कालच्या साडेदहा तासांच्या चौकशीनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी केली जाणार आहे. आज पुन्हा चौकशी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. पण काल (सोमवारी) एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. नॅशनल …

Read More »

इंडस्ट्रीत क्वालिटी हवी : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : इंडस्ट्रीत क्वालिटी कंट्रोल करण्याचे कार्य केल्यास उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ निश्चितच लाभणार असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. श्रींच्या दिव्य सानिध्यात दि. बेळगाम इंडस्ट्रीयल को-ऑप बॅंक शाखा संकेश्वरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री …

Read More »