Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

गोमटेश स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित निपाणी हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते. अश्विनी हत्ती यांनी स्वागत केले. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. …

Read More »

बोरगाव आर. ए. पाटील सीबीएससीचा दहावी निकाल १०० टक्के

अध्यक्ष उत्तम पाटील : श्रीवर्धन इजारे प्रथम निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम सीबीएसई पॅटर्नचे ज्ञान मिळावे. विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावेत, यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. शाळेच्या …

Read More »

सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा उद्या निपाणीत गौरव समारंभ

निपाणी (वार्ता) :  भारतीय सेनेतून शांती सेनेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात निपाणीचे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण यांच्या युनिटने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विशेष बहुमानाबद्दलनिपाणी शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत गुरुवारी (ता.२८) गौरव समारंभाचे आयोजन केले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण …

Read More »

संकेश्वर सीबीएसई शाळेचा शंभर टक्के निकाल

  संकेश्वर (महंमद मोमीन) :  संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के पाटील सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळेचा दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. आदित्य नार्वेकर या विद्यार्थ्यांने ९९ % गुण मिळवून राज्यात तिसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून …

Read More »

संकेश्वरात शहिदांना अभिवादनाने कारगिल विजयोत्सव साजरा.

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कमतनूर वेस येथील राहुल भोपळे सर्कल येथे कारगिल युध्दातील शहीद जवानांना तसेच संकेश्वरचे शहीद जवान राहुल भोपळे, सतीश सुर्यवंशी यांना शतशः नमन करून कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात आला. युवानेते प्रदीप माणगांवी यांनी शहीद जवान स्मारकाची पूजा करुन अभिवादन केले. नगरसेवक सचिन भोपळे, नेताजी आगम …

Read More »

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

  बेळगाव : भारतीय सैन्याची शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस महत्वाचा आहे. हा दिवस याची आठवण करून देतो की, आपले कित्येक जवान हसत हसत शहीद झाले पण देशासाठी प्राणपणाला लावून लढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना कारगिल युद्धात करावा लागला. अन्न नाही, झोप नाही, वातावरणही पोषक नसताना देखील भारतीय सैन्याने …

Read More »

राज्यसभेत गोंधळ, तृणमूलच्या सात जणांसह 19 खासदारांचं एका आठवड्यासाठी निलंबन

  नवी दिल्ली : लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधकांवर कारवाई करण्यात आली असून खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात तृणमूल काँग्रेसच्या सात खासदारांस 19 खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. राज्यसभेत हौद्यात उतरून घोषणा दिल्या. …

Read More »

आ. निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पेयजल योजना जारी : महादेव कोळी

  भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न खानापूर : बहुग्राम पेयजल प्रकल्प योजनेसाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 2018 पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना त्यांना यश आले असून देगाव पेयजल प्रकल्पासाठी 565 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भाजपने याचे श्रेय फुकटात लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला खानापूर काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन

  नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसकडून देशभरात निषेध मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज दुसर्‍यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. सोनिया गांधींच्या या चौकशीमुळे …

Read More »

भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का! नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

  नवी दिल्ली : बर्मिंगहममध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी बर्‍याचदा चांगली …

Read More »