Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

शहापूर जोशीमळा आत्महत्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

  बेळगाव : शहापूर जोशीमळा येथे विष प्राशन करून तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलबाराव बोरसे यांनी सांगितले. गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची …

Read More »

नंदगड येथील संगोळी रायन्ना संग्रहालयाचे १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बैलहोंगल तालुक्यातील संगोळी येथे राहिलेली विकासकामे आणि सौंदर्यीकरणासाठी सरकारने २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली. बंगळूरू येथील विकास सौधमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली संगोळी रायन्ना विकास प्राधिकरणाची बैठक …

Read More »

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

  मुंबई : महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा संजय शिरसाट आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेलप्रकरणात संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे समजते. संजय शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात ही …

Read More »

गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित!

  मुंबई : महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबईतील पावसाळी अधिवेशनादरम्यान बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी हे भाष्य केले. आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गणेशोत्सवाबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. आशिष …

Read More »

काजू चोरी प्रकरणी उचवडे येथील तरुणास अटक; ४२ पोती काजू, ट्रक जप्त

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी उचवडे (ता. खानापूर) येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. …

Read More »

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

  बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांपासून ते निकृष्ट दर्जाच्या आहारापर्यंत विविध मुद्द्यांवर आवाज उठवत कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. आज अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनच्या आवाहनानुसार आणि विविध संघटनांच्या संयुक्त कृतीने पुकारलेल्या अखिल भारतीय संपाचा भाग म्हणून, बेळगाव …

Read More »

लिटल स्ट्रायकर्स चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

  बेळगाव : बेळगावमध्ये राजेश लोहार यांनी २०२१ मध्ये सुरू केलेले चित्रपट निर्मितीगृह, अस्मिता क्रिएशन्स अतिशय कमी वेळात यशाची शिढी चढत आहे. अस्मिता क्रिएशन्सचा पुढील मराठी चित्रपट अन्विता येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपट लेखक व दिग्दर्शक संतोष सुतार यांनी पत्रकारांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अस्मिता क्रिएशन्सने आता हिंदी …

Read More »

आनंदनगर दुसरा क्रॉस अंधारात; पथदीप दुरुस्तीची मागणी

  बेळगाव : आनंद नगर वडगाव दुसरा क्रॉस येथील रस्त्यावरील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसह वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर असल्यामुळे अंधारात या रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. स्थानिक नागरिकांनी या …

Read More »

अलमट्टी धरणाच्या अतिरिक्त पाण्याच्या विसर्गासंदर्भात उच्चस्तरीय बैठक संपन्न!

  मुंबई : दि. ९ जुलै २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा. ना राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणाचे नियमन या अत्यंत संवेदनशील विषयावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीस माझ्या समवेत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, …

Read More »

अद्याप एका नगरसेवकाकडून मिळकतीचा तपशील सादर नाही

  बेळगाव : महानगरपालिकेच्या विरोधी गटाच्या एका नगरसेवकाने अद्याप आपल्या मिळकतीचा तपशील सादर केलेला नाही. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांच्या मिळकतीची माहिती मिळविण्यासाठी माहिती कायदेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अर्जधारकांना 2021 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करताना सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यात नमूद केलेली मिळकतीचा तपशील त्याचप्रमाणे मागील दोन …

Read More »