Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

रौद्ररूप धारण केलेल्या पावसाने बैलहोंगलकर हैराण; रस्ते जलमय, दुचाकी वाहून गेल्या

  बैलहोंगल : बैलहोंगल शहरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही मिनिटांत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर झाले, तर अनेक सखल भाग जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुपारी अचानक सुरू झालेल्या मेघगर्जनेसह पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. पावसाच्या प्रचंड वेगामुळे शहरातील अनेक …

Read More »

वडगांव येथील बेपत्ता व्यक्तीचा खानापूर येथे मृतदेह मलप्रभा नदीत आढळला; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

  खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदी घाट परिसरात बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुंदन वसंत कलघटकर (वय ४८, रा. यरमाळ रोड, वडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खानापूर पोलिसांकडून सुरू …

Read More »

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीत पाठ्यपुस्तके द्या; शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन

  निपाणी : मराठी माध्यम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणासह इतर विषयांची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विविध सामाजिक, शैक्षणिक व मराठी संघटनांच्या प्रतिनिधींनी निपाणी क्षेत्र शिक्षण कार्यालयाकडे केली आहे. यासंदर्भात क्षेत्र शिक्षणाधिकारी मा. नाईक मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, निपाणी परिसरातील मराठी …

Read More »

सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे रेशन वितरणाचा खोळंबा; जूनचे धान्य वाटप १४ जूनपासून

  बेळगाव : मे महिन्यात वारंवार सर्व्हर डाऊन होणे, बायोमेट्रिक पडताळणीतील तांत्रिक अडचणी आणि दोन महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरित करण्याच्या प्रक्रियेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा पुरता गोंधळ उडाला होता. परिणामी अनेक रेशन दुकानदारांना महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य वितरण सुरू ठेवावे लागले. या पार्श्वभूमीवर जून महिन्याचे रेशन वितरण १४ जूनपासून सुरू होणार …

Read More »

भूमिगत गटार व 24×7 पाणीपुरवठा प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा; आमदार आसिफ सेठ यांचे निर्देश

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात सुरू असलेल्या भूमिगत गटार (यूजीडी) आणि 24×7 पाणीपुरवठा प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने आमदार आसिफ सेठ यांनी एल अँड टी कंपनीचे अधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी …

Read More »

मराठी शाळांतील कन्नड सक्तीविरोधात युवा समितीच्या वतीने उद्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

  बेळगाव : मराठी शाळांमध्ये सुरू असलेल्या कन्नडसक्तीविरोधात तसेच मराठी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या शैक्षणिक अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन …

Read More »

बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील लढा तीव्र करा; २२ जूनच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ देसाई

  खानापूर : बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी गावागावांत जनजागृती वाढवून २२ जून रोजी बेळगाव येथे आयोजित भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. तर सीमाभागातील प्रश्नांवर युवा समिती करीत असलेले कार्य योग्य दिशेने असून त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला …

Read More »

उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक ५, वडगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक ५, वडगाव येथे जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, जनजागृती प्रभातफेरी आणि विद्यार्थिनींना वृक्षांचे वाटप अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सीआरपी प्रमुख श्री. इमाम सनदी यांनी …

Read More »

अल्पवयीन मुलगा कार चालवताना पकडला; वाहन मालकाला २५ हजारांचा दंड

  बेळगाव : शहरातील चन्नम्मा सर्कल परिसरात वाहतूक पोलिसांनी सोमवारी अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचे आढळून आल्यानंतर वाहन मालकाविरुद्ध कठोर कारवाई केली. न्यायालयाने संबंधित वाहन मालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांची तपासणी सुरू असताना केए-26-एम-3409 क्रमांकाची कार एका अल्पवयीन …

Read More »

निपाणी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी

  संघटनेच्या वार्षिक सभेत निवड निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सूर्यवंशी यांनी स्वागत व केले. अध्यक्ष नरेंद्र बाडकर, उपाध्यक्ष विनायक पाटील यांनी गतवर्षी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. पेट्रोलचे दर व इतर महागाई पाहता तसेच फोटोग्राफीमध्ये …

Read More »