Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

वीज कंपनीच्या खाजगीकरणाच्या विरोधात कर्नाटक राज्य रहित संघटना आंदोलन करणार : राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांचा इशारा

  निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वच ठिकाणी ऊर्जेचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घरातील विद्युत व्यवस्था लहान-मोठे उद्योगांचा समावेश आहे. त्यामुळे वीज ही प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेवीज हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. परंतु. सार्वजनिक हिताला बाजूला करून जनसामान्यांच्या या मूलभूत …

Read More »

खेळांमुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक विकासास मदत : विजयालक्ष्मी मण्णीकेरी

  बेळगाव : खेळांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. खेळांमुळे आपला फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक व सामाजिक विकास होण्यास मदत मिळते, असे विचार रोटरी क्लब दर्पणच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी मण्णीकेरी यांनी व्यक्त केले. विजयालक्ष्मी मण्णीकेरी या हॉकी बेळगांव, रोटरी क्लब दर्पण व रोटरी क्लब नाॕर्थतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदान …

Read More »

घरकुल लाभार्थींची १५ जूनपूर्वी निवड न केल्यास नगरपालिकेसमोर विलास गाडीवड्डर यांचा उपोषणाचा इशारा

  निपाणी (वार्ता) : सर्वसामान्यांसाठी शासनाने राबवलेल्या घरकुल योजना पूर्ण झाली आहे. पण लाभार्थींना घरकुल हस्तांतरित करण्यासाठी श्रेय वादाचे राजकीय नाट्य रंगले आहे. अशा परिस्थितीत योग्यलाभार्थ्यांची निवड १५ जून पूर्वी चिठ्ठी काढून करावी. अन्यथा नगर पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरपालिका …

Read More »

व्हॅक्सिन डेपो, डीएचओ कार्यालयाजवळ उघड्यावर वैद्यकीय कचरा

  बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) कार्यालयाच्या शेजारील झुडपांमध्ये वैद्यकीय कचऱ्याची पाकिटे उघड्यावर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष आर. दरेकर यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी डीएचओ कार्यालय आणि बेळगाव महानगरपालिकेला तातडीने हा कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन …

Read More »

‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग’ : महापालिका सभेतच ठराव मांडणार; आमदार आसिफ सेठ यांची घोषणा

  बेळगाव : ‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे’ या ठरावाच्या मंजुरीबाबत बेळगाव महापालिकेकडून होत असलेल्या विलंबावर आता पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी महापालिका सभेत हा ठराव आपण स्वतः मांडणार असल्याची घोषणा बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी केली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत …

Read More »

कर्नाटक समर्थक ठरावासाठी कन्नड संघटनांचा आटापिटा

  बेळगाव महापालिकेविरोधात कारवाईची मागणी; मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या कृती समितीने राज्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे सोमवारी निवेदन सादर केले. कन्नड भाषा, संस्कृती आणि राज्याच्या हिताविरोधी भूमिका घेणाऱ्या महापालिकेविरुद्ध कठोर कारवाई करावी, …

Read More »

बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार पी. के. बडीगेर यांना “कर्नाटक छाया रत्न” पुरस्कार

  बेळगाव : गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेले बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार पी. के. बडीगेर यांना “कर्नाटक छाया रत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १२ जून रोजी सकाळी १० वाजता बंगळूरु येथील पॅलेस ग्राऊंड्समधील त्रिपुरा वासिनी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फोटो टुडे’ प्रदर्शनात प्रदान केला …

Read More »

मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेसाठी नागरिकांच्या सहकार्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

  बेळगाव : जिल्ह्यात ३० जून ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या विशेष सर्वांगीण पुनरावलोकन मोहिमेला राजकीय पक्ष आणि नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. सुवर्ण विधानसौध येथे सोमवारी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत …

Read More »

स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; उकळते स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा मृत्यू, 6 जण गंभीर

  विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विझाग स्टील प्लांट येथे सोमवारी सायंकाळी भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. स्टील मेल्टिंग शॉप (SMS-2) विभागात क्रेनद्वारे वाहतूक करण्यात येत असलेल्या उकळत्या स्टीलच्या लॅडलमध्ये (मोठ्या भांड्यात) अचानक बिघाड होऊन वितळलेले स्टील कामगारांवर कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात …

Read More »

पुणे येथील खानापूर-बेळगाव मित्रमंडळाचा सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा

  बेळगाव : सीमाभागातील मराठी अस्मिता आणि प्रलंबित सीमाप्रश्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला पुणे येथील खानापूर-बेळगाव मित्रमंडळाने उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शेकडो सीमाभागीय नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमालढ्याशी आपली बांधिलकी व्यक्त केली. …

Read More »