Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

देसूर क्रॉसजवळ लॉरी-दुचाकी धडक : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

बेळगाव : दुचाकी आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील देसूर क्रॉसजवळ घडली. गजपती गावातील अक्षय हिरेमठ याचा मृत्यू झाला. आणखी एक नागय्या हिरेमठची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  बेळगाव ग्रामीण पाेलिस ठाण्यात ही …

Read More »

सातनाळी, माचाळी गावच्या पुलावर चार फुट पाणी, गावाला बेटाचे स्वरूप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला पांढऱ्या नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने पांढऱ्या नदीला पुर आला. आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना सतावत असतात. याकडे संबंधित तालुक्याच्या …

Read More »

मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा : किरण जाधव

  बेळगाव : कर्नाटक मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम बेंगळूर येथील आरमने मैदान, त्रिपुरवासिनी, बेंगळूर येथे मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मराठा समाज बांधवांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी …

Read More »

सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी

सिंगापूर : सिंगापूरच्या ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं चीनच्या वांग झि यि हीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरली. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची व्यापक बैठक उद्या

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील 60 गावांचा समावेश कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने कस्तुरीरंगन अहवालाला विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने हा विरोध …

Read More »

वडगाव कारभार गल्ली येथे घर कोसळून नुकसान; श्रीराम सेनेकडून मदत

बेळगाव : वडगाव कारभार गल्ली येथील लक्ष्मी पारकर यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगाव परिसरात सध्या पावसाचा जोर सुरू आहे. अतिपावसामुळे कारभार गल्ली वडगाव येथे घराची भिंत कोसळली. याची माहिती श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांना देण्यात आली. तातडीने कोंडुस्कर यांनी घटनास्थळी भेट …

Read More »

अडकूर येथे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान, सुदैवाने निराधार वृद्धा वाचली

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय ६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने वाचली. अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या …

Read More »

गोव्यातील काँग्रेसच्या ‘त्‍या’ आठ आमदारांपैकी पाच आमदार चेन्नईला रवाना

पणजी : गोव्यातील ११ काँग्रेस आमदारांपैकी ८ जण फुटण्याची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यावर पडदा पडतो न पडतो तोच आता पुन्हा काँग्रेसचे आमदार फुटण्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आठ आमदार फुटू नयेत यासाठी आपल्या पाच आमदारांना चेन्नई येथे पाठवले आहे. मार्च २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या …

Read More »

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, नड्डा यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच …

Read More »

संकेश्वरात रस्त्यांची वाट लागलीयं….!

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील बरेच रस्ते पावसाच्या पाण्याने उखडलेले दिसताहेत. बऱ्याच रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी तसेच ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांत पावसाचे पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील अंबिका नगरला जाणारा रस्ता चांगलाच गैरसोयीचा बनलेला …

Read More »