बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सहा पिंजरे आणि पंधरा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान गोल्फ मैदानाजवळील ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद झाला आहे. मात्र सर्वांना धडकी भरवणारा बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात केव्हा कैद होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. गेले तीन दिवसांपासून बिबट्या शोधासाठी अथक …
Read More »हंदूर येथील घर कोसळून झाले दोन महिने पण नुकसानभरपाईसाठी महसूल खाते निद्रिस्त
खानापूर (विनायक कुंभार) : सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराला महसूल विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. महसूल विभाग हे अतिसंवेदनशीलतेची भूमिका बजावत असते. त्याच्या विरोधात येथील महिलेने सरकारी अधिकाऱ्यांना भावनिक आवाहन करून पडझड झालेल्या घराचा पुन्हा एकदा पंचनामा करून घर देण्याची मागणी केली. केरवाड (ता.खानापूर) ग्रामपंचायत क्षेत्रातील …
Read More »बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी
बेळगाव : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा माहिती खात्याला दिलेल्या प्रतिनिधी पत्रकात नितेश पाटील यांनी सोमवारी या शाळांना सुट्टीची घोषणा केली आहे. तीन दिवसापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये …
Read More »भारतीय फिरकीपटूंसमोर विंडीजचे लोटांगण; भारताचा 4-1 ने मालिका विजय
फ्लोरिडा : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाचवा टी20 सामना भारताने 88 धावांनी जिंकत मालिकाही 4-1 ने जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 189 धावाचं लक्ष्य वेस्ट इंडीजला दिलं, जे पार करताना वेस्ट इंडीज 100 धावांच सर्वबाद झाले आणि भारत जिंकला. विशेष म्हणजे भारताकडून 10 च्या 10 गडी …
Read More »गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शाळांना सुट्टी
बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ कोर्स परिसरातील एक किलोमीटर परिघातील मधील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रॅप कॅमेरा बिबट्याची छायाचित्रे आल्यानंतर वन खात्याने शोध मोहीमेचा केंद्रबिंदू गोल्फ कोर्स परिसर केला आहे. गोल्फ कोर्स …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी तर देवस्थान कमिटी पंच रणजीत चव्हाण पाटील कार्याध्यक्षपदी निवड झाली. पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये 2022-23 साठी कोंडुस्कर यांची सर्वानुमते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात …
Read More »तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार
चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …
Read More »कलबुर्गी हत्या प्रकरण; स्वतंत्र साक्षीदाराने दुचाकीस्वाराची ओळख पटविली
बंगळूर : ज्येष्ठ विद्वान एम. एम. कलबुर्गी यांच्या खून खटल्यातील एका स्वतंत्र साक्षीदाराने शनिवारी धारवाड येथील सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका मोटार सायकलस्वाराची ओळख पटवली, ज्याने गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला कलबुर्गी यांच्या घरी आणले होते. कलबुर्गी यांच्या घरासमोर एक छोटेसे दुकान असलेल्या साक्षीदाराने प्रवीण चतुरला २०१५ मध्ये खून झाला तेव्हा …
Read More »नगारजी, पठाण यांचा बागवान समाजातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी माजी सभापती सद्दाम नगारजी व चिक्कोडी जिल्हा वक्फ बोर्ड उपाध्यक्ष पदी शेरगुलखान पठाण यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बागवान समाजातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष जुबेर बागबान (शादो) उपाध्यक्ष खलील चावलवाले सेक्रेटरी शौकत बागबान संचालक जुबेर सरदार बागबान भाई, जब्बार …
Read More »आप्पाचीवाडी फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सुदैवाने जीवितहानी टळली कोगनोळी : केरळहून मुंबईकडे आल्ले घेऊन जाणारा मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. यामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्याजवळ घडला. याबाबत घटनास्थळावरुन व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta