खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील फुटपाथवर बसून व्यापार करणाऱ्या व्यापारी वर्गाला दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत दोन दिवसाचे मार्गदर्शन शिबीर शुक्रवारी येथील केएसआरपी रोडवरील समुदाय भवनात पार पडले. शिबीराच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेविका मेघा कुंदरगी, नगरसेवक लक्ष्मण मादार, शिबीराचे मार्गदर्शक एस. …
Read More »पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, ३० ठार, ५६ जखमी
पेशावर : पाकिस्तानातील पेशावर शहरातील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाज पठणावेळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३० जण ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले आहेत. मशिदीत नमाज पठणावेळी मोठी गर्दी होती. याच दरम्यान बॉम्बस्फोट झाला. बचावकार्य करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार भागातील जामिया मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज अदा करत …
Read More »महाविकास आघाडीचे राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी पत्र
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, छगन भूजबळ आणि नाना पटोलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभेचं रिक्त असलेलं अध्यक्षपद आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्यांवरून ही भेट झाली असून, यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. ते अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याचे आदेश …
Read More »गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी गाजविली ओपन रॅपिड चेस टूर्नामेंट
केली परितोषिकांची लयलूट बेळगाव : येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील खुल्या गटात गोल्डन स्क्वेअरच्या प्रकाश कुलकर्णी याने 9 राउंडमध्ये 8 पॉईंट मिळवीत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. अजय चेस अकॅडमीच्यावतीने येथील युनियन जिमखाना सभागृहात ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजण्यात आली होती. …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता
कोल्हापूर (जिमाका): वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात …
Read More »विराट कोहलीने 100 व्या कसोटी सामन्यात पूर्ण केल्या 8000 धावा
भारताकडून असा विक्रम करणारा सहावा खेळाडू मोहाली : विराट कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील 100 वी कसोटी खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 38 धावा करत विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटमधील 8 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावा करणारा विराट कोहली भारताचा …
Read More »शाहुनगरात सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास विरोध
बेळगाव : बेळगावातील शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारील सार्वजनिक जागेत खासगी शाळा बांधण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे शाळा बांधण्यास परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन स्थानिकांनी आज जिल्हाधिकार्यांना दिले. शाहुनगरातील विनायक कॉलनीतील हनुमान मंदिराशेजारी 8 गुंठे सार्वजनिक जागा आहे. या जागेत शाळा बांधण्याचा प्रयत्न कट्टीमनी शिक्षण …
Read More »सैन्य दलासाठी सृजनशीलता, नेतृत्वगुण आवश्यक!
कर्नल विलास सुळकुडे : देवचंदमध्ये छात्रांचा सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : छात्रांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतोय, असे न म्हणता दृढनिश्चय पूर्वक ‘मी यशस्वी होणारच’ असे ठामपणे सांगितले पाहिजे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी दुसरा पर्यायच उरत नाही. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बी. एस. एफ., सी आर पी एफ, आय सी एस एफ, आय. …
Read More »खानापूर पशुखात्याच्यावतीने आधुनिक डेअरी उद्योग शिबीर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पशुसंगोपन खात्याच्यावतीने गुरूवारी पशुखात्याच्या सभागृहात तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी आधुनिक डेअरी उद्योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराच्या अध्यक्षस्थानी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. कोडगी होते. तर पशु तज्ञ डॉ. आमाज अहमद नंदगड, डॉ. आनंद संगमी इटगी यांनी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. शिबीराचे उद्घाटन शेतकरी शिवाजी ईश्वर …
Read More »मन्सापूरात निवृत्त लष्करी अधिकार्यांचा सन्मान
खानापूर (प्रतिनिधी) : देशाची सेवा करून लष्करी अधिकारी सेवानिवृत्त होऊन मायदेशी परतले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा खानापूर तालुक्यातील मन्सापूर गावात ग्रामस्थांच्यावतीने नुकताच आयोजित करण्यात आला. यामध्ये निवृत्त सुभेदार व्यंकाप्पा विठ्ठल भोसले, निवृत्त हवालदार आंध्रू फर्नांडिस, किरण चौगुले, शिपाई पदावरून निवृत्त झालेले संतान बोर्झिस आदीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासु …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta