तुमकूर : परदेशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. …
Read More »राज्यात लॉकडाऊन नाही! : आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे. ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची शक्यता …
Read More »आरटीपीसीआर रिपोर्ट शिवाय कर्नाटकात प्रवेश नाही : डीवायएसपी मनोजकुमार नाईक
सीमा तपासणी नाका बंदोबस्त कडक कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट असणे गरजेचे आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणार्या प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येणार आहे, अशी माहिती चिक्कोडी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांनी दिली. कोगनोळी …
Read More »धामणे(एस) परिसरात हत्तींचा धुमाकूळ
बेळगाव : एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असताना आता धामणे (एस) परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी तिलारी परिसरातील धामणे(एस) व चंदगड तालुक्यातील काही गावात हत्तींचा उपद्रव होत असतो. गेल्या चार दिवसांपासून धामणे (एस) परिसरात तीन हत्तींचा वावर असून भात …
Read More »अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचलीची निवडणुक जाहीर
राज्यातील 61 नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणुक बंगळूर : सध्या राज्यातील 25 विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्यातील 61 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 डिसेंबरला निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचली, एम. के. हुबळी आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही याच दिवशी होणार …
Read More »दोन्ही सभागृहांमध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक चर्चेविना मंजूर
नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे परत करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायदे मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. केंद्रीय …
Read More »चिगुळे मराठी शाळेच्या इमारतीची दुर्दशा, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील व अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिगुळे येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. चिगुळे मराठी शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालतात. मात्र शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने केवळ तीनच वर्गात सर्व …
Read More »एस.के.ई. सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून एनसीसी दिवस साजरा
बेळगाव : ठळकवाडी हायस्कूलमध्ये नोव्हेंबर महिन्यातील चौथा रविवार एनसीसी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, संविधान दिवस कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर, ज्येष्ठ शिक्षक विवेक पाटील, सुरेश भातकांडे, उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. आर. कुडतूरकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपले …
Read More »असीम सरोदे यांचे उद्या बेळगावात व्याख्यान
बेळगाव : कायदे तज्ञ असीम सरोदे सोमवारी बेळगावला भेट देणार आहेत. सोमवार दि 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 5.30 वाजता सरोदे यांचे बेळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृह गिरीश कॉम्प्लेक्स बापट गल्ली कार पार्किंग येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते ‘बेळगाव मध्ये होणारी मानवाधिकारांची पायमल्ली’ या विषयावर आपले …
Read More »राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी चक्क धरणातून सोडले पाणी; अधिकार्यांची चौकशी
बेंगळुरू : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल)ने लिंगनमक्की धरणातून सुमारे 500 क्युसेक पाणी सोडले जेणेकरून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग फॉल्स धबधबा पाहता यावा. अधिकार्यांनी यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकार्यांनी हा प्रताप केला आहे. कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta