Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर तालुक्यातील ७३ गावे स्मशानभूमीच्या प्रतिक्षेत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका विकासापासून वंचित आहेत. अशा तालुक्यातील ७३ गावात अद्याप स्मशानभूमीची सोय नाही. एकीकडे जंगलाने व्यापलेला तालुका असुन जवळपास ३९ गावांत वनजमिनी असल्याने अडचणी येत आहेत. त्याचबरोबर ३४ गावातून सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत. तेथे सहकारी जमिनी खरेदी करण्यात येणार आहे. तेव्हा स्मशानभूमीसाठी जागा खेरदी करायची असेल अथवा …

Read More »

घोटगाळी ग्राम पंचायतवरील आरोप बिनबुडाचे : अध्यक्ष संतोष मिराशी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी ग्राम पंचायतीच्या विकास कामाबाबत काही विघ्नसंतोषी नागरिकांनी बिनबुडाचे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत सरकारने गावच्या विकास व्हावा, लोकाना रोजगार मिळावा, या उद्देशाने …

Read More »

….बेळगावात अवतरली शिवसृष्टी!

                बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. कोरोनाचे सावट दूर झाल्याने प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित …

Read More »

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच निर्णय

मुख्यमंत्री बोम्मई, उपमुख्यमंत्रिपदावर मुख्यमंत्र्यांचे मौन बंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्रिमंडळाचा विस्तार कि पुनर्रचना याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय लवकरच कळविणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी येथे दिली. शाह मंगळवारी शहरात असताना मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल यावर काही चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारले असता, दिल्लीला गेल्यावर …

Read More »

बसवजयंतीनिमित्त खिळेगावला विविध कामांना चालना

मंगल कार्यालय भूमिपूजन, टी-शर्ट वितरण : आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती अथणी : बसवजयंतीचे औचित्य साधून खिळेगाव येथे विकासकामांचे उद्घाटन व युवक मंडळाला टी शर्ट वितरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी या सर्व कार्यक्रमांना चालना दिली. आ. पाटील यांनी खिळेगाव बसवेश्वर मंदिराला भेट …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची उद्या कुप्पटगिरीत जनजागृती सभा

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनजागृती व पुनर्बांधणी संदर्भात कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसुरकर यांच्या गावी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात उद्या दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर खानापूरची ग्रामदेवता चौराशी …

Read More »

रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन

कवी संमेलनाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात …

Read More »

छत्रपती राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्त प्र. ले. संघाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन : वक्ते प्रा. आनंद मेणसे

बेळगाव: प्रगतिशील लेखक संघ बेळगांव यांच्यावतीने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीसोहळा निमित्त शुक्रवार दिनांक 6 मे 2022 रोजी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत बसवेश्वर जयंती तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त ज्येष्ठ विचारवंत, …

Read More »

प्रभाग १३ ची पोटनिवडणूक नेसरी विरुद्ध नेसरी होणार?

अण्णा-तम्मा लढतीसाठी सज्ज संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नगरसेवक निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नुकतेच काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील …

Read More »

सेवानिवृत्तीनिमित्त मारुती नारायण दळवी यांचा सत्कार!

खानापूर : ब्रँच पोस्टमास्तर मणतुर्गा मारुती नारायण दळवी यांचा मुदतपूर्व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ खानापूर पोस्ट ऑफिस येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य डाकघर खानापूर पोस्टमास्तर विरभद्रप्पा बेंचनमर्डी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साऊथ सब डिव्हिजन बेळगाव श्री. बी. पी. माळगी, माजी तालुका पंचायत सदस्य मणतुर्गा बाळासाहेब महादेवराव शेलार, …

Read More »