बेळगाव : बळ्ळारी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा दि. 2 ते 6 जुलै दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हॉकी बेळगाव संघ रवाना झाला. यामध्ये संघात यशवंत बजंत्री, अशोक येळूरकर, भैरू आरे, समर्थ अकोळ, समर्थ करडीगुद्दी, आर्यन घगणे, फैजल, रोहीत घुगरी, पार्थ कडलास्कर, आदर्श अमाती, अयान …
Read More »….म्हणे सीमाप्रश्न संपलेला अध्याय : इराण्णा कडाडी बरळले!
बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला अध्याय आहे. स्थानिक नेते केवळ राजकारण करण्यासाठी सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे, स्थानिक जनतेला फक्त विकास पाहिजे, असे हास्यास्पद विधान करून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी मराठी भाषिकांना डिवचले आहे. त्यामुळे इराण्णा कडाडी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा …
Read More »तब्बल दोन वर्षांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार!
नवी दिल्ली : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेपाची याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून याबाबतची सुनावणी १४ जुलै रोजी निश्चित करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने एकनाथ …
Read More »आदर्श मल्टीपर्पज सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणी मुलांचा होणार गौरव
बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि पीएच. डी. प्राप्त मुलांचा …
Read More »अलतगा – कडोली संपर्क रस्त्या म्हणजे मृत्यूचा सापळा!
बेळगाव : अलतगा- कडोली संपर्क रस्त्यावर अलतगा हद्दीत भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे दुचाकी वाहन तसेच मालवाहू रिक्षा चालकांनी या रस्त्यावरुन या प्रवास करण्याचे बंद केले …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मन्नूर येथील कलमेश्वर हायस्कूलमध्ये बांधलेले टॉयलेट ब्लॉक शाळेला सुपूर्द
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मन्नूर येथील कलमेश्वर हायस्कूलमध्ये नवीन बांधलेले टॉयलेट ब्लॉक अभिमानाने सुपूर्द केले – शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि प्रतिष्ठा सुधारण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल. उद्घाटन प्रथम महिला अॅन पद्मजा पै यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एजी रो. अॅड. महेश बेल्लद, आरसीबी दर्पण अध्यक्षा …
Read More »इंगळी मारहाण प्रकरण : कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पीएसआय निलंबित
बेलगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी हुक्केरी पोलिस स्थानकाचे पीएसआय निखिल कांबळे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. २६ जून रोजी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायी घेऊन जाणारे वाहन पकडून पोलिस ठाण्यात आणले. यावेळी गुन्हा …
Read More »डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या
आमदार इक्बाल हुसेन; १०० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा बंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाची मागणी तीव्र झाली आहे, रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी उघडपणे डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, शिवकुमार यांना पाठिंबा देणारे १०० आमदार मुख्यमंत्र्यांमध्ये बदल घडवू इच्छितात, अशी मागणी केली आहे. त्यांना सुशासन हवे आहे आणि डीके …
Read More »मुख्यमंत्री बदलाबाबत आमदार, खासदारांशी चर्चा नाही
रणदीप सिंह सुरजेवाला; बैठकांचा सपाटा सुरूच बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलावर अभिप्राय गोळा करण्याची शक्यता एआयसीसीचे सरचिटणीस आणि पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मंगळवारी फेटाळून लावली. दरम्यान, सुरजेवाला यांनी आमदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा अहवाल व त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. …
Read More »अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि विनयभंग प्रकरणी दोन आरोपींना पाच वर्षाची सक्तमजुरी
बेळगाव : राजकीय संघर्षातून तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मोटारसायकलवरून घेऊन जाऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याच्या प्रकरणात, बेळगाव येथील विशेष जलदगती पॉक्सो न्यायालयाने दोन आरोपींना प्रत्येकी ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २०२१ मध्ये हुलकुंद गावाजवळ घडली. काटकोळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta