Thursday , December 11 2025
Breaking News

Belgaum Varta

पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!

फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर कोल्हापूर (वार्ता) : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणार्‍या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त …

Read More »

जपानच्या खेळाडूला धक्का देत पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!

टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले. सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर.. सिंधू आता …

Read More »

पुनर्वसनाबाबत कठोर निर्णय घेऊ, पाठीशी रहा; मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा कोल्हापूर (वार्ता) : ‘मला महापुराच्या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘पुनर्वसनाबाबत काही कठोर निर्णय घेऊ, या निर्णयांच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्‍यावर असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते …

Read More »

नागरगाळी पुलाची दुरावस्था बससेवा ठप्प

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक, रस्ते पुलाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. अशाच प्रकारे नागरगाळी मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहे.त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे.खानापूर, नंदगड, नगरगाळी मार्गावरून जाणाऱ्या बस वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे या मार्गावरून नागरगाळी, अळणावर, हल्याळ, दांडेली आदू …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी कोल्हापूर शहरातील शाहुपूरी भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने- सामने आले. याची जोरदार चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री …

Read More »

खानापूर-रामनगर महामार्गाची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर-रामनगर महामार्गाची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दुरावस्था झाली आहे.त्यामुळे लोंढा-रामनगर भागातील नागरिकांना खानापूर, बेळगाव प्रवास करणे शक्यच नाही आहे.सध्या काही भागात पॅचवर्कचे काम करण्यात येत आहे. याची पाहणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी शुक्रवारी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली.यावेळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत …

Read More »

उपनगर परिसरात साहेब फाऊंडेशनवतीने रोगप्रतिबंधक डोस

बेळगाव : बेळगावातील उपनगर परिसरात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे.याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशन आणि भारतमाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतनगर, चांभारवाडा व परिसरातील नागरिकांना रोगप्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली. साहेब फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्‍य उत्‍सव उपक्रम आयोजित करण्यात आला …

Read More »

पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हलशी-मडवाळ रस्ता तुटण्याचा संभव

खानापूर (प्रतिनिधी) : यंदा खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली. असाच प्रकार खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावर झालेला आहे.याबाबतची माहिती अशी की, हलशी- मडवाळ रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल हा माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून ८६ लाख रूपये खर्चून उभारण्यात आला आहे.मात्र पांढऱ्या नदीच्या …

Read More »

केरळमध्ये लॉकडाऊन; 66 टक्के जनता कोरोनाबाधित

तिरुअनंतपुरम (बेळगाव वार्ता) : मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल. केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात 22 हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या 50 टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर

मुंबई (बेळगाव वार्ता) : राज्य शासनाचा 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे …

Read More »