बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री युवावर्ग मद्यपान, धूम्रपान अशा अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत असे गैरप्रकार करण्यात येत आहेत. अनेक …
Read More »कर्नाटक बंदला कन्नड संघटनांचा नकार!
बेळगाव (वार्ता) : राज्यभरात काही दिवसात झालेल्या अनुचित घटनांना महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरून काही कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला इतर काही कन्नड संघटनांनीच विरोध केला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सामाजिक शांतता बिघडविण्याचे कृत्य करत आहे, असा आरोप काही कन्नड संघटनांनी तसेच कन्नड आंदोलक वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली करत …
Read More »नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई : डीसीपी आमटे
बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे आपण सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे उल्लंघन करणार्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »भिडे गुरुजींवरील वॉरंट न्यायालयाने केले रद्द
बेळगाव (वार्ता) : येळ्ळूर येथील कुस्ती आखाड्याप्रसंगी आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणीच्या खटल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर बजावण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने आज रद्दबातल केले. येळ्ळूर येथे गेल्या दोन वर्षापूर्वी कुस्ती आखाड्यावेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक -अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर सरकारने …
Read More »थकीत वेतनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे आंदोलन
बेळगाव (वार्ता) : उर्वरित वेतन त्वरित द्यावे, यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्यांनी आंदोलन छेडले. ग्राम पंचायत कर्मचार्यांना सरकारी निधीतून वेतन देण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण 8 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून उर्वरित 4 महिन्यांचे थकीत वेतन यासह 12 ते 15 महिन्यांचे थकीत वेतन अद्याप …
Read More »2023 च्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आणणे हेच ध्येय : मुख्यमंत्री बोम्माई
हुबळी (वार्ता) : 2023 साली होणार्या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणणे हे माझे ध्येय असून यासाठी आतापासूनच संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. अरुण सिंग यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, असं विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलंय. हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त …
Read More »रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील, शुभम शेळके व प्रकाश शिरोळकर यांच्यावर आणखी 3 गुन्हे दाखल
मराठी द्वेषाने केलेल्या दुटप्पी कारवाईमुळे बेळगावात संतप्त प्रतिक्रिया बेळगाव (वार्ता) : बेंगलोर घटनेनंतर बेळगावात आक्रोश व्यक्त करण्यात आला. त्यात बेळगावात काही ठिकाणी अज्ञातांकडून तोडफोड झाली. मात्र, त्यात शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील व शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठी भाषिक असल्याने …
Read More »भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांचे वादग्रस्त वक्तव्य
बेंगळूर : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्या धर्मांतराच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्यांनी आपले विधान बिनशर्त मागे घेतले आहे. कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी उडुपी येथील एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. ज्यामध्ये सूर्या यांनी ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली …
Read More »तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा
रायपुर : सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे तेलंगणा आणि छत्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली उसुन या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यम सदनी धाडण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. भद्राद्री कोठागुडेम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. …
Read More »पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?
अनियंत्रित गर्दी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं राज्यांना पत्र नवी दिल्ली : पूर्णपणे कोरोनाच्या छायेत गेलेले 2021 हे वर्ष संपून 2022 ची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे. दरम्यान, या विषयी गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta