बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका तसेच कित्तूर तालुका परिसरात होत असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज आणि अंगणवाड्यांना उद्या पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज बुधवारी 25 जून रोजी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या गुरूवार …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी दुपारी दोन वाजता हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर …
Read More »अतिवृष्टीमुळे आनंद नगर दुसरा क्रॉस येथे तलाव सदृश्य परिस्थिती…
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे आनंद नगर दुसरा क्रॉस येथे तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे नागरिकांना ये- जा करणे अवघड झाले आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे पायी चालत जाणाऱ्यांना तसेच दुचाकीस्वारांना ये- जा करणे कठीण बनले आहे. …
Read More »कर्नाटक राज्य सरकार “इंदिरा आहार किट” योजना राबवणार!
बेळगाव : राज्यातील बीपीएल धारकांना “इंदिरा आहार किट”चे वाटप करण्याचा कर्नाटक राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. सध्या दरमहा केंद्र सरकारकडून पाच किलो व राज्य सरकारकडून पाच किलो असे प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे परंतु बीपीएल धारकांना वाटप करण्यात येणारा तांदूळ हा आवश्यकतेपेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने तांदळाचा …
Read More »कणकुंबी चेकपोस्टजवळ अस्वलाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टजवळ एका अस्वलाने जनावरे चारायला घेऊन गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, दशरथ वरंडीकर (६०) नामक व्यक्ती आज बुधवारी पहाटे आपली जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले असताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा …
Read More »गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीकरण जागरूकता सत्र
बेळगाव : आज, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने रोटरॅक्ट क्लब ऑफ युवा दर्पण, इंटरॅक्ट क्लब ऑफ लव्हडेल सेंट्रल स्कूल आणि लव्हडेल सेंट्रल स्कूल यांच्या सहकार्याने मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीकरण जागरूकता सत्र यशस्वीरित्या आयोजित केले. अध्यक्षा आरटीएन रूपाली जनज यांच्या हार्दिक स्वागताने सत्राची सुरुवात झाली. अतिथी वक्त्या आरटीएन डॉ. अनिता …
Read More »खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री पूल पाण्याखाली
खानापूर : खानापूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर-हेमाडगा मार्गावरील मनतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर जवळजवळ पाच फूट पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे वाहनधारक व प्रवासी वर्ग पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर करीत आहेत. काल दिवसभर व संपूर्ण रात्रभर …
Read More »भारत विकास परिषदेची प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगावात अपूर्व उत्साहात संपन्न
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने कर्नाटक उत्तर प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगाव येथे आय.एम.ई.आर.च्या सभागृहात रविवारी उत्साहात पार पडली. कार्यशाळेस दक्षिण भारत विभागीय मुख्य सचिव पुरुषोत्तम शास्त्री (आंध्र प्रदेश), विभागीय वित्त सचिव राजगोपाल पै (केरळ), सहसचिव एम्. भार्गव (बेंगलोर), शिवराम शेनॉय (बेंगलोर) त्याचप्रमाणे उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी …
Read More »मुसळधार पावसात महापालिका आयुक्त “ऍक्शन मोडमध्ये”
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून बेळगाव शहरात संततधार पावसाची सुरुवात झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी मंगळवारी शहराचा दौरा करून पाहणी केली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठीकठिकाणी पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. गटारी व नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना …
Read More »पीआय पेक्षा कमी दर्जाच्या पोलिसांना चलन देवू नये; माजी आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नांना यश
गोवा : बेळगाव-गोवासह देशातील इतर राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना पीआय दर्जाच्या खाली असलेल्या कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसा चलन काढू नये तसेच पीआय दर्जाच्या वरील अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या/खोटे बोलणाऱ्यांना एमव्ही चलन जारी करावेत. असा मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गोव्याच्या एडीजीपींना एक आदेश जारी केल्याबद्दल भाजप कर्नाटक राज्य उपाध्यक्ष आणि बेळगाव उत्तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta