खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात जाणाऱ्या तालुका मलप्रभा क्रिडांगणाजवळील रस्त्याची दुर्दशा झाली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगर मयेकर नगरात जाणाऱ्या रस्त्याचे दुरूस्तीचे काम झालेच नाही. त्यामुळे याभागात गुडघाभर चिखल पावसाळ्यात होतो. त्यामुळे वाहने अडकण्याच्या घडना घडतात. नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यानगर, मयेकर नगरातील नागरिकांतून …
Read More »संकल्प फाऊंडेशनने दिली चाफ्याचा वाडा शाळेला दिली भेट
खानापूर (प्रतिनिधी) : संकल्प फाऊंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील चाफ्याचा वाडा येथील लोअर प्रायमरी शाळेला नुकताच भेट दिली आणि विद्यार्थांना मास्क व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय शाळेतील मूलभूत सुविधांची विचारपूस करून शाळेला होईल तेवढी मदत करण्याचा पुढाकार घेतला.सुरूवातीला शाळेच्या सहशिक्षिका सौ. निलम शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.. संकल्प फाऊंडेशनच्यावतीने शाळेसाठी …
Read More »खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ३३३ घरे जमीनदोस्त
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात नुकताच थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत ३३३ घरे जमीनदोस्त झाली आहेत.शहरासह तालुक्यातील विविध गावात मुसळधार पावसामुळे घरे पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.या कुटूंबाना तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.मागील आठवड्यात गुरूवारी व …
Read More »कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी बसवराज बोम्मई शपथबद्ध!
बेंगळुरू: गेल्या कांही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आज बुधवारी सकाळी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद व गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधीप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिनोळी येथे रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा उपक्रम राबविला आहे. चंदगडवासीयांची होणारी गैरसोय थांबावी व नेहमी उपलब्ध व्हावी यांसाठी सर्व सोयी नियुक्त अशी अत्याधुनिक अम्ब्युलन्स 24×7 तास रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी प्रभाकर दादा खांडेकर …
Read More »पूरग्रस्तांना राष्ट्रीय काँग्रेस चंदगडचा मदतीचा हात…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी तालुक्यातील दाटे, बुझवडे, तळगुळी, कानडी, कानूर, बामनकेवाडी गावाचा दौरा केला. घुल्लेवाडी- निटूर दरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला सुनीता पांडुरंग कंग्राळकर यांच्या घरी …
Read More »पथदीप दिवसाही सुरूच!
बेळगाव : ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील संपूर्ण मार्गावरील पथदीप दिवसा सुरु असल्याचे निदर्शनास आले. यामुळे हेस्कॉमचा अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. हेस्कॉमने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Read More »अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी
अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला पहाणी आढावा बेळगाव : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय …
Read More »नवा अभिनव; निलावडे ग्रा. पं. चा जनरेटरने पाणी पुरवठा
खानापूर (प्रतिनिधी) : संकटाना निवारण्यासाठी माणसाची नेहमीच धडपड असते. असेच पिण्याच्या पाण्याचे संकट निवारण्यासाठी नवा अभिनव यशस्वी झाला. निलावडे (ता. खानापूर) ही ग्रामपंचायत तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिजंगल व डोंगराळ भागात आहे.याभागात कधीच वीजपुरवठा सुरळीत नसतो. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेटसावीत असतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष …
Read More »3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप; कॅम्पात तणावाचं वातावरण
बेळगाव : शहरातील कॅम्प भागात 3.7 वर्षीय लहान मुलीवर दोघा युवकांनी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशात कोरोना संकट अधिक गडद होत आहे. अशातच राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कॅम्पच्या स्वामी बेकरीजवळील कसाई गल्लीतील अल्पसंख्याक समुदायातील चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. दोघांवर त्या चिमुरडीवर अत्याचार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta