Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने होत असलेला वापर थांबवा

मा.राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन बेळगाव : देशभरात चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत जी कारवाई होत आहे ती कुठे तरी थांबावी आणि देशाची लोकशाही अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देशाचे महामहिम राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्रीना निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत …

Read More »

बेकवाड पिडीओची बदली; ग्रा. पं. सदस्य झुंजवाडकर यांचे आंदोलन मागे

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायत हद्दीतील खैरवाड ग्रा. पं. सदस्य रूक्माणा झुंजवाडकर यांचे सोमवारपासुन तालुका पंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामात यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती उजेडात आली …

Read More »

माणिकवाडी मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : माणिकवाडी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष महेश मयेकर होते. कार्यक्रमाला प्रा. शंकर गावडा, गणपती सुतार सौ.प्रिती प.गोरल, सर्व ग्रा.पं.सदस्य,{तसेच गंगाराम गुंडू होनगेकर, मधुकर होनगेकर निवृत्त सैनिक आदी उपस्थित होते. पाहुण्याच्याहस्ते …

Read More »

शिवजयंती उत्सव दणक्यात होऊ द्या

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्यासंदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते. सुनील जाधव म्हणाले की, बेळगाव शहर परिसरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात २.७५ टक्के वाढ

बंगळूर : बसवराज बोम्मई प्रशासनाने मंगळवारी (ता.५) सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) त्यांच्या मूळ वेतनाच्या २४.५० टक्क्यावरून २७.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २.७५ टक्के वाढीव डीए मिळणार आहे. हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल, असे वित्त विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे. …

Read More »

संकेश्वरात श्री रेणुकादेवी आंबील कार्यक्रम भक्तीमय वातावरणात

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील सौ. लक्ष्मीबाई बाबू कासारकर यांच्या निवासस्थानी श्री रेणुकादेवी (आंबील) महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सुभाष कासारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीची पूजा करून महाप्रसादाचे पूजन केले. श्रींच्या हस्ते प्रसाद पूजनानंतर महाप्रसाद वाटप …

Read More »

खानापूर तालुक्याच्या हेस्काॅम खात्यात १८२ जागा रिक्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वायरमनच्या जागा न भरल्याने हेस्काॅम खात्यात १८२ वायरमनच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करताना हेस्काॅम खात्याला तारेवरची कसरत करावीशी लागते. नुकताच झालेल्या वादळी पाऊसाने तालुक्यातील जंगल भागातील खेड्यात …

Read More »

संकेश्वरात मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमाला “नो पब्लिसिटी”

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील साईनाथ चित्रपटगृहाजवळच्या ओढ्यावरील ब्रिज (पूल) निर्माण कार्याचा नारळ राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी फोडला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पूल निर्माण आणि तेथील २४ मिटर रस्ता रुंदीकरण कामासाठी ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंत्री उमेश कत्तीं संकेश्वरच्या सर्वांगिण …

Read More »

सिंगीनकोपात ग्रामदैवत कलमेश्वर यात्रेची सांगता

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे मंगळवारी दि. ५ रोजी ग्रामदैवत श्री कलमेश्वर यात्रा सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. सालाबादप्रमाणे यंदाही श्री कलमेश्वर यात्रेला सोमवारी दि. ४ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी गावातील विविध देवदेवताची विधावत पुजा, अभिषेक करण्यात आले. दुपारी २ वाजता करडी मजल व भजनाच्या नादात गावातुन देवीची …

Read More »

माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडे

वेदांत सखी ग्रुपच्या महिला दिन कार्यक्रमात अनुजा रजपुत यांचे प्रतिपादन बेळगाव : आपल्या कुटुंबासाठी सर्व स्त्रिया कष्ट घेत असतात. कौटुंबिक कामाबरोबरच छंदही जोपासतात. इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची भावना बरेच काही चांगले कार्य करून जात असते. अशाच इच्छेतून मी समुद्रसपाटीपासून 5864 मीटर उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर झालेला आनंद …

Read More »