Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

श्री जलाराम फाउंडेशनतर्फे रुग्णांना स्वेटर ब्लँकेटचे वाटप

बेळगाव : संत श्री जलाराम बापा यांच्या धर्मपत्नी मा. विरबाई माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे बीम्स हॉस्पिटलमधील निराधार 22 रुग्णांना आज शनिवारी स्वेटर, ब्लॅंकेट, फळे, बिस्किटे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. जगात ज्यांचे कोणीही नाही. घरदार नसल्याने जे रस्त्यावर आले आहेत. वयोवृद्ध होण्याबरोबरच सतत आजारी पडणे आणि …

Read More »

बसवन कुडचीत उद्या मरगाई देवी मुर्तीची मिरवणूक

बेळगाव : मंगळवारी होणाऱ्या बसवण कुडचीतील श्री मरगाई देवीची मूर्ती स्थापना आणि कळसारोहण कार्यक्रमानिमित्त आज रविवार सकाळपासून बसवण कुडचीत मूर्तीची मिरवणूक होणार आहे. नागेश स्वामी दिवटे यांच्या घरापासून मिरवणुकीला सुरवात होणार आहे. बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीमध्ये जुने प्राचीन मरगाई मंदिर काढून तिथे नवीन मंदिर बांधले आहे, त्या मंदिराचा …

Read More »

कॅन्सरला घाबरु नका : डाॅ. एस. व्ही. मुन्याळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : कॅन्सरला घाबरु नका. त्यावर प्रभावी औषधोपचार आहेत. कर्करोगाचे वेळीच निदान झाले की धोका टाळता येणे शक्य असल्याचे बेळगांव जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी सांगितले. ते संकेश्वर शासकीय रुग्णालय, एनसीडी घटकतर्फे आयोजित कॅन्सर डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थितांचे स्वागत विक्रांत रायप्पगोळ यांनी केले. …

Read More »

अंकलेची पाणी समस्या सुटली : रमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले ग्रामपंचायतची पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न फलदायी ठरल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले गाडगी गल्लीतील श्री गणेश जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन, दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, अंकलेकरांचा पाणी प्रश्न सुटला …

Read More »

‘सायलंट’ मतदारांच्या हाती कुडतरीचे भवितव्य! रेजिनाल्डवर नाराजी : पण आव्हान कायम   मडगाव: अवघ्या 27 दिवसात दोन पक्ष बदलणारे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यावर कुडतरीत लोक प्रचंड नाराज आहेत. मात्र, असे असले तरी अपक्ष म्हणून यावेळी निवडणूक लढवित असूनही ते अजून मुख्य शर्यतीतून मात्र बाहेर पडलेले नाहीत.पण निर्णय सायलंट वाटणाऱ्या मतदारांच्या …

Read More »

क्रीडा भारतीतर्फे सोमवारी सामूहिक सूर्य नमस्काराचे आयोजन

क्रीडा भारतीतर्फे सोमवारी सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोज बेळगांव : फेब्रुवारी कॉलेज रोडवरील लिंगराज कॉलेज महाविद्यालयाच्या मैदानावर आयुष मंत्रालय भारत सरकारच्या मान्यतेने क्रीडाभारती, पतंजली योग समिती व केएलई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या “आजादी का अमृत महोत्सव” …

Read More »

महिलांना सकस आहार, दररोज ध्यान साधना व योगा करणेची गरज : डॉ. सविता कद्दू

तारांगण व आयएमएमार्फत कर्करोग जागृती अभियान बेळगाव : सध्याची दगदगीचे जीवनशैली आणि मानसिक तणाव यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सदृढ शरीरासाठी महिलांनी सकस आहाराचे सेवन, दररोज ध्यान साधना व योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ञ व जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सविता कद्दू यांनी केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त …

Read More »

गर्लगुंजीच्या वेशीत बस शेडसाठी टाकलेल्या खड्डी, वाळूचा वाहतुकीला अडथळा

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या वेशीत नव्याने उभारण्यात आलेल्या बस शेडसाठी वाळू, खड्डी व इतर साहित्य लक्ष्मीमंदिराच्या समोर आणून टाकण्यात आले आहे. त्यातच बस शेडचेही काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या वाळू, खड्डी व इतर साहित्याची वाहतुकीला तसेच गावच्या नागरिकांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा …

Read More »

करंबळच्या शिवारात विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून ३० एकर जमिनीतील ऊस जळून खाक

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावच्या शिवारातील विद्युत खांब्याच्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिणगी पडून जवळपास २० ते २५ कर जमिनीतील ऊस शुक्रवारी दि. ४ रोजी जळून खाक झाला. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, करंबळ गावच्या पट्टीतील ऊसाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी विद्युत खांबावरील ताराचे वाऱ्यामुळे एकमेकाचे घर्षण झाले व …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायतला तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट

बेळगाव : तालुका पंचायत अधिकारी राजेश धनवाडकर यांनी आज दि. 4 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतला भेट देऊन कचरा विस्थापन केंद्र व उद्योग खात्री योजनेमध्ये चाललेल्या कामाची पाहणी करून रोजगार महिला व पुरुषांना फर्स्ट एड किटचे वितरण करण्यात आले. तसेच येळ्ळूरमधील पुढील विकासकामासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पीडिओ, …

Read More »