बंगळूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी रविवारी (ता.११) कर्नाटकचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मावळते राज्यपाल वजूभाई रुदाभाई वाला यांची ते आता जागा घेतील.कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती अभय श्रीनिवास ओका यांनी गेहलोत यांना राजभवन येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते …
Read More »बेळगावात २५ जुलै रोजी मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन
उदघाटक खासदार संजयजी राऊत साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्षपदी निवड स्वागताध्यक्ष साहित्यिक शरदजी गोरे निमंत्रक सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजिवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना संधी मिळावी यासाठी ही एक चळवळ म्हणून विचारपीठ आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित दुसरे अखिल …
Read More »हलगा गावामध्ये युवा समितीच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : युवा समितीच्या संकल्प २१००० वृक्षारोपण या उपक्रमाला अनुसरून हलगा गावामधील स्मशानभूमी, मराठी शाळा आणि शारदा गर्ल्स हायस्कूलच्या आवारात रोपे लावण्यात आली. या वेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, हालगा ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारीहाळकर, ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामाणाचे, भुजंग सालगुडे, वासु सामजी, युवा समिती उपाध्यक्ष …
Read More »यरगट्टीत होणार शेतकरी हुतात्मा दिन
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेनेतर्फे 21 जूलै रोजी आचरणात आणला जाणारा शेतकरी हुतात्मा दिन यावर्षी बेळगाव जिल्ह्यातील रयत संघटना-हरित सेनेतर्फे यरगट्टी येथे गांभीर्याने पाळल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची बैठक अलिकडेच गोकाक येथे जिल्हा रयत संघटनेचे तसेच प्रत्येक तालूका पदाधिकारी यांची येथील विश्रामगृहात बैठक व …
Read More »येळ्ळूर रोडवर ट्रक-टेम्पो अपघात; सुदैवाने हानी नाही
बेळगाव : येळ्ळूर रोड मार्गे रोज खानापूर तालूक्यातून वाळू, विटाच्या गाड्या भरधाव येत- जात असतात. शेतात जाणारे शेतकरी, महिला या गाड्यांचा वेग पाहून आधीच घाबरत बाजूला होतात. त्यात आज सकाळी 9.30 च्या सुमारास येळ्ळूरकडून वडगावकडे जाणारी भरलेली भरधाव ट्रक तसेच वडगावकडून येळ्ळूरमार्गे खाली होऊन जाणारा भरधाव टेंम्पो यांची येळ्ळूर सिमेजवळ …
Read More »तळावडे शाळेच्या विद्यार्थीनीला केंद्राची शिष्यवृत्ती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा जंगल भागातील तळावडे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थीनी कुमारी अंकिता सलाम हिने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यशामुळे तिला इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी ४८ हजार रूपयाची शिष्यवृत्ती देण्यात …
Read More »हंचिनाळ येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
कोगनोळी : हंचिनाळ येथील पाटील मळ्यातील शेतात उसाचा पाला काढत असताना सापाने पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अमृत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसारसौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. नेहमीप्रमाणे येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात श्री. दादासो पाटील यांच्या …
Read More »शेतकऱ्यांच्या श्रमदानातून कालवा स्वच्छ
बेळगाव : गांधीनगर किल्ला खंदकापासून ते बळ्ळारीपर्यंत जोडणाऱ्या कालव्यातून गवत व झाडे झुडपे, वाढल्याने शिवारात पाणी जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर यांनी पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे हा नाला स्वच्छ करण्याची गरज लक्षात …
Read More »हबनहट्टीत लोकसेवा फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : हबनहट्टी (ता. खानापूर) व बेळगाव जिल्ह्याचे दक्षिण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हबनहट्टी येथे मलप्रभा नदीवर वसलेले, पंचक्रोशीतील काशी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रात लोकसेवा फौंडेशन बेळगावचे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र हबनहट्टीच्या परिसरात पिंपळ, वड, बेलपत्र, पेरू, आंबा अशा वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात …
Read More »बिडीत न्यू नवहिंद मल्टीपर्पजच्या शाखेचा वर्धापन दिन उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बिडी येथे येळ्ळूर येथील न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या बिडी शाखेचा 16 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विनोद पाटील, जवळी मेडिकलच्या सौ. प्रतिभा जवळी, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे खानापूर डिओ सी. डी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta