Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

सीमाभागातील पहिले ऑनलाईन साहित्य संमेलन 25 जुलै रोजी

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव यांच्याकडून 25 जुलै 2021 रोजी बेळगाव सीमाभागातील पहिलेच ऑनलाईन संमेलन होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत दिली. दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी (ऑनलाईन) साहित्य संमेलन ऑनलाईन पध्दतीने सकाळी 11.00 …

Read More »

काळाचा घाला; देवदर्शनाहून येताना ट्रकला धडक; दोन युवक ठार

चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत …

Read More »

कारची झाडाला धडक हिरेहट्टीहोळी गावच्या युवकाचा अपघाती मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड गाववाजवळ स्विप्ट कारची झाडाला जोराची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. सदर युवक खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावचा असून याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हिरेहट्टीहोळी येथील युवक राहुल चंद्रकांत हणबर (वय १९) हा आपल्या मित्रासोबत खानापूरात गाडी रिपेरीसाठी सोडली होती. रिपेरी झाल्यानंतर रात्रीच …

Read More »

खानापूरात रेशन किट वितरणात सावळा गोंधळ

तहसीलदार कार्यालयासमोर धरणे खानापूर : लेबर कार्डधारकांना रेशन कीट देण्याऐवजी इतर लोकांना सरकारकडून आलेले रेशन किट वितरित करीत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे बैलुर, कामगारासह यांनी खानापूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले होते.या आंदोलनाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठींबा व्यक्त करण्यात आला व तहसीलदार कार्यालय येथे सुरू …

Read More »

कचरा डेपो कामाचा नागरगाळीत शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : गावाला गायरान नाही, गावठान नाही. शेतकऱ्याच्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावित असतानाच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात कचरा डेपो सक्तीने उभारण्यात येत आहे.असाच प्रकार खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्राम पंचायत हद्दीतील जागेवर कचरा डेपो लवकरच उभारण्यात येणार आहे.या कामाचा शुभारंभ तालुका पंचायत कार्यनिवाहक अधिकारी प्रकाश हल्लपणावर यांच्या हस्ते कुदळ …

Read More »

चारशे कोटीची न्यूनवहिंद मल्टीपर्पज येळ्ळूरच्या सोसायटीची उलाढाल

खानापूर प्रतिनिधी) : चारशे कोटी रूपयाची उलाढाल, २०० कोटी रूपये एफ डी, १६० कोटीचे कर्ज वाटप अशी प्रगती साधत न्यूनवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट येळ्ळूरच्या सोसायटीने प्रगती साधली आहे. त्यामुळे खानापूरात सोसायटीला आदराचे स्थान आहे. असे विचार शिवशक्ती सोयाटीचे संस्थापक शंकर पाटील यांनी खानापूर शाखेच्या १६ वा वर्धापनदिनी शनिवारी साजरा करताना व्यक्त …

Read More »

आंबोली धबधब्याला पर्यटकांची वाढतीये गर्दी…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील): चंदगड तालुक्यापासून काही ठराविक अंतरावर असणाऱ्या व सावंतवाडी हद्दीमधे असणाऱ्या आंबोली येथील धबधब्याला आता पावसाळी हंगामामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा या ठिकाणी होत असून निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य या धबधब्याला लाभलेले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पर्यटक या पर्यटनस्थळाचा आनंद …

Read More »

कामगारांना मिळाले कामगार कार्ड : कार्डधारकांतून समाधान व्यक्त

नितीन जाधव यांच्या प्रयत्नाना यश बेळगाव : शहापूर भागातील सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांनी विशेष प्रयत्न करून संबंधित विभागाकडून परिसरातील कामगार वर्गासाठी कामगार कार्ड काढून घेतली. त्या कामगार कार्डांचे वितरण आज प्रभाग क्रमांक 19 मधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नितीन जाधव यांच्या उपस्थितीत विनायक हावळाणाचे, मनोज केरवाडकर, युवराज हावळाणाचे, विनायक …

Read More »

चोर्ला गावच्या विद्यार्थ्यांना रेंजसाठी जंगलात धाव

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेताना रेंज मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र खानापूर तालुक्यातील पारवाड ग्राम पंचायत हद्दीतील चोर्ला, पारवाड, व इतर गावात कोणतीच रेंज नाही. त्यामुळे काही गावातील विद्यार्थ्यांना रेंज मिळविण्यासाठी जंगलातुन गोवा हद्दीपर्यत तर काही गावातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र हद्दीपर्यत जाऊन ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेताना नाकेनऊ येत …

Read More »

संतोष दरेकर आणि त्यांच्या टीमचे किरण जाधव यांच्याकडून प्रशंसा

बेळगाव : कोरोना महामारी हा आजार आहे. जो आपल्या आजूबाजूला इतका पसरला आहे, की आजपर्यंत पाहिली जाणारी सर्वात कठीण परिस्थिती. शिवाय, यात काही शंका नाही की बरेच लोक आणि डॉक्टर, परिचारिका आणि पोलिसांसारख्या आघाडीच्या कामगारांनी आपले आयुष्य रेषावर ठेवले असले तरीसुद्धा ते आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.आमच्याकडे असे …

Read More »