Thursday , March 5 2026
Breaking News

Belgaum Varta

महापालिका आयुक्त शुभा बी. यांचा शहरात फेरफटका!

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी आज सकाळी अचानकपणे महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. आज त्यांनी शहरात फेरफटका मारत शहरातील गणपत गल्ली येथील नरगुंदकर भावे चौकातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि उपस्थिती तपासली. त्यानंतर, पायोनियर अर्बन बँकेसमोरील कार्यालयालाही त्यांनी …

Read More »

कन्नडसक्ती मोर्चाची कोरे गल्लीत जनजागृती

  बेळगाव : : 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्ती विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार कोरे गल्ली सह, हट्टीहोळी गल्ली, कचेरी गल्ली, रामलिंगवाडी परिसरातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी गल्लीतील म. ए. समिती कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे, मनोहर शहापूरकर, राजाराम मजुकर, राजकुमार बोकडे, राजू चिगरे, …

Read More »

अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठ यश; माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार!

  कोल्हापूर : अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आले आहे, माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचे आश्वासन वनताराकडून देण्यात आले आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांदणी परिसरात माधुरीसाठी घर …

Read More »

उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा!

  बेळगाव : बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा सुरू होता. या तक्रारीच्या आधारावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला आहे. लोकायुक्त अधिवक्ता शुभविर जैन यांच्या नेतृत्वाखाली ही धाड …

Read More »

पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकीसह वाहून गेला ‘वॉटरमॅन’

  बेळगाव : काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहामध्ये अचानक वाढ झाल्याने वॉटरमॅन वाहून गेल्याची घटना तारीहाळ गावात घडली आहे. कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मुसळधार पावसामुळे जलाशयातील प्रवाह देखील वाढला आहे. दरम्यान खानापूर तालुक्यातील गाडिकोप्पा येथील ‘वॉटरमॅन’ सुरेश निजगुणी गुंडण्णवर (वय ३४) हे चंदनहोसूर येथे पाइपलाइन दुरुस्त करून …

Read More »

निट्टूर (खानापूर) ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी; समुदाय भवनासाठी अर्धनग्न आंदोलन

  बेळगाव : निट्टूर ग्रामपंचायत हद्दीतील दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बेळगाव युवा कर्नाटक भिमसेना आणि युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात युवा कर्नाटक भिमसेना तसेच युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निट्टूर ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अर्धनग्न आंदोलन केले. 2007 …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; नंदगड येथे जनजागृती

  खानापूर : कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या घटनात्मक अधिकारांवर कर्नाटक प्रशासन एक प्रकारे गदा आणत आहे. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कन्नडसह मराठीतही शासकीय परिपत्रके मिळण्याचा अधिकार आहे परंतु कर्नाटक सरकार बेकायदेशीररित्या सीमाभागात कन्नडसक्ती करत आहे. या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांना पुन्हा तडीपारीची नोटीस

  ८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यावर पोलिस प्रशासनाने पुन्हा तडीपारीची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून पोलिस उपायुक्तांनी ही नोटीस दिली असून ८ ऑगस्ट रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत हजर …

Read More »

सदाशिव नगर महिला हत्या प्रकरण : अवघ्या पाच तासात आरोपी ताब्यात…

  बेळगाव : सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी महादेवी करेन्नावर वय वर्षे 45 या महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. सदर खून पैशाच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यादृष्टीने तपास करत एपीएमसी पोलीस पथकाने अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती …

Read More »

रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट कार्यक्रमाला प्रतिसाद

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट भाग १ हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील एका खाजगी हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.हा कार्यक्रम रोटरी सदस्यांना नेतृत्व कौशल्य रोटरी विषयी सखोल ज्ञान आणि …

Read More »