Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

राज्यात अनुसूचित जाती अंतर्गत उपविभागीय आरक्षण

  मंत्रिमंडळाचा निर्णय; ए, बी, सी प्रवर्गांना नव्या प्रमाणात वाटप बंगळूर : राज्यातील दलित समाजाच्या दीर्घकालीन मागणीसंदर्भात अनुसूचित जाती (एससी) अंतर्गत उपआरक्षणाबाबत मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, डाव्या आणि उजव्या गटांना प्रत्येकी ५.२५ टक्के आरक्षण देण्यात येणार असून इतर गटांना …

Read More »

बेळगावमध्ये ओढ्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बंबरगा गावाजवळ ओढ्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या हेल्पलाइन रेस्क्यू टीमने अत्यंत कमी वेळात मृतदेह पाण्याबाहेर काढून शोधमोहीम फत्ते केली. आज दुपारी १२ च्या सुमारास बंबरगा गावाजवळील ओढ्यात करगुप्पी येथील रहिवासी बसवराज मारुती माळगी हे पडल्याची माहिती पोलीस …

Read More »

शहरातील 11 घरफोडी प्रकरणात पाच जणांना अटक; 67.9 लाखांचे दागिने जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरातील 11 घरफोडी प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील सुमारे 67.9 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली. बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हनुमाननगर, …

Read More »

श्रीराम सेना हिंदूस्थान आयोजित “बेळगाव हिंदकेसरी” पर्व तिसरे बैलगाडा शर्यतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात

  बेळगाव : अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित बेळगाव हिंदकेसरी किताबाच्या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन सोहळा आज दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटनप्रसंगी अनगोळ गावातील शेतकरी बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी मरगाई मंदीर येथे देवाची विधिवत पूजा करण्यात आली. …

Read More »

मातोश्री सौहार्द सोसायटीच्यावतीने कलमेश्वर हायस्कूलच्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  मण्णूर : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने कलमेश्वर हायस्कूल, मण्णूरचा दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भरत चौगुले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत सोसायटीच्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर कलमेश्वर हायस्कूलमधील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन …

Read More »

वादळी वाऱ्यामुळे माणकापूर शाळेचे नुकसान; सहकाररत्न उत्तम पाटील यांनी केली पाहणी

  निपाणी (वार्ता) : बोरगावसह परिसरात गुरुवारी (ता.२३) वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना तडे जाण्यासह छप्पर उडून गेली आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय माणकापूर येथे वादळी वाऱ्यामुळे प्राथमिक शाळेचेही नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी शुक्रवारी (ता.२४) …

Read More »

उचगाव येथे 28 एप्रिल रोजी बैलगाडी पळवण्याची जंगी शर्यत

  उचगाव : येथील शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता एका बैल जोडीने रिकामी गाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. या शर्यतीचे उद्घाटन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि हर्षा शुगरचे मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काडाचे अध्यक्ष …

Read More »

कवी परशराम खेमणे उद्या गुंफणार कवी समजून घेतानाचे सहावे पुष्प

  बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने “कवी समजून घेताना – पुष्प सहावे” या उपक्रमांतर्गत कवी परशराम खेमणे यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “जगण्याचे पान” या शीर्षकाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात कवी परशराम खेमणे आपल्या कवितांमधील अनुभव, भावना आणि सर्जनशील प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहेत. ते …

Read More »

सामाजिक बांधिलकीचे महत्व प्रत्येकाने जाणून घ्यावे : रामदासी महाराज

  बेळगांव : सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्य क्षेत्रात बेळगाव शहराचे आपले खास वैशिष्ट्य आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगाव शहरात आजही अनेक सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे आपले कार्य करत आहेत.सामाजिक बांधिलकीचे महत्व जाणून प्रत्येकाने राष्ट्राचा कणा मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री. रामदास महाराज यांनी बोलताना केले. मुक्तिधाम सेवासुधारणा मंडळाच्या वतीने …

Read More »

बेळगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा

  बेळगाव : बेळगावमध्ये आज वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दुपारी बेळगाव शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार वळिवाचा पाऊस झाला. दुपारच्या सुमारास अचानक आकाश …

Read More »