Wednesday , August 19 2026
Breaking News

प्रशासनाकडून महिन्याभरात घरकुलांच्या वितरणाचे आश्वासन : विलास गाडीवड्डर यांचे आंदोलन स्थगित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतर्फे राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशन आश्रय योजना जी प्लस २ अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वितरण येत्या महिन्याभरात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून करण्यात येईल, अशी लेखी आश्वासन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन येत्या महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विलास गाडीवड्डर म्हणाले, शहरातील बेघर गरजूंना हक्कांची घरे मिळावीत यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. घरकुल वितरणाप्रसंगी गोंधळ घालण्यात आला. याकामी सक्रिय असलेल्या स्वार्थी प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य पात्र घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर त्यांना घरे हस्तांतरित केली जावीत, या उद्देशाने सतत याचा पाठपुरावा आयुक्त गणपती पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केला. त्यानुसार त्यांना येत्याघरांचे वितरण न केल्यास नगरपालिकेसमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर अधिकारी वर्गाने खुलासा केला आहे. त्याप्रमाणे लाभार्थीच्या यार्दीची विविध निकषांनुसार पडताळणी करून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छानणी करण्यात येईल, त्यानंतर ती यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर घरकुलांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरासाठी आंदोलन पुढे ढकलण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केल्याने आपण त्यांच्या विनंतीनुसार आपले उपोषण आंदोलन पुढे ढकलत असून या कालावधीत घरकुलांचे वितरण न केल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचे शेवटी गाडीवड्डर यांनी सांगितले. पत्रकार बैठकीस बाळासाहेब देसाई-सरकार, डॉ. जसराज गिरे, विनोद चोरगे, अनिल संकपाळ, विकास जाधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *