Saturday , December 13 2025
Breaking News

Belgaum Varta

मराठी विद्यानिकेतनचे खो-खो स्पर्धेत यश….

  बेळगाव : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा संघातर्फे 14 वर्षाखालील व 14 वर्षावरील मुलामुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन माध्यमिक विभागाच्या मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम 11,111 रुपये बक्षीस व ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत स्नेहा हिरोजीची ऑल-राउंडर खेळाडू व वैष्णवी कोवाडकरची उत्कृष्ट …

Read More »

बेळगावातून जायंट्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शनसाठी ३५ सभासद रवाना

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्सचे तब्बल ३५ सभासद दिनांक १२ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता कोल्हापूर–धनबाद एक्सप्रेसने मथुरा–वाराणसी येथे होणाऱ्या जायंट्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन गोल्डन जुबिली समारंभासाठी भव्य उत्साहात रवाना झाले. हे कन्व्हेन्शन १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून, बेळगावच्या प्रतिनिधींची ही उपस्थिती …

Read More »

सन्मान शिक्षणाचा, गौरव नेतृत्वाचा: अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांच्या राजस्तरीय पुरस्काराचा गौरव

  खानापूर : मराठा मंडळ बेळगाव संचलित, खानापूर तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज , हितचिंतक व संस्थेच्या वतीने सन्माननीय अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचा खानापूरात भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू यादव यांच्या धवल शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने 1 नोव्हेंबरला 2025 …

Read More »

कुर्लीत रविवारी १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

  अध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी; दिवसभर पाच सत्रांचे आयोजन निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच्.जे.सी. चीफ फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे रविवारी (ता.१४) सिद्धेश्वर हायस्कूलच्या पटांगणावर दिवंगत मुख्याध्यापक व्ही. बी. शिंदे व्यासपीठावर १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी हे असून दिवसभर पाच …

Read More »

दीन- दलितांची ‘माय”, कुटुंबीयांची प्रेमळ “आक्का”

  आयुष्यात अशी काही व्यक्तिमत्व येतात जे दिसायला साधी, सोपी, सरळ वाटत असली तरी त्यांच्या अंतःकरणातील खणखरता आणि करुणेचा खोल ऊब सर्व समाजाला कवटाळून घेते. माजी आमदार, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी (तात्या) यांच्या धर्मपत्नी शांताबाई म्हणजेच आम्हा सर्वांच्या “आक्का” हे देखील एक असेच तेजस्वी व्यक्तिमत्व. आज त्या आपल्यात नाहीत; पण त्यांचा …

Read More »

आई माझी गुरु, आई कल्पतरू, सौख्याच्या सागरु!

  आमची आई 1 डिसेंबर 2025 ला आमच्यातून निघून गेली. आज तिचा बारावा दिवस या निमित्ताने तिच्याविषयी थोडं लिहावंसं वाटलं. सगळ्यांची आक्का असली तरी, ती आमची आईच होती. नात्याने सासू असली तरी तिने आम्हा सर्वांना आईचेच प्रेम दिले. अगदी साधी, भोळी, प्रेमळ सतत आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी आई… आईचं माहेर …

Read More »

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

  लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत भावना बेरडेला 1 रौप्य, 1 कांस्यपदक

  बेळगांव : हासन येथील जिल्हा क्रीडांगणावर मंगळूर पब्लिक स्कूल आयोजित विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुरस्कृत 36 व्या विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा अनगोळ शाळेच्या भावना भाऊ बेरडे हिने 1 रौप्यपदक, 1 कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात लांबउडीत भावना …

Read More »

नंदिहळ्ळी – राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन

  बेळगाव : नंदिहळ्ळी – राजहंसगड रस्त्यावर आज रात्री बिबट्याचे दर्शन झाले, त्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड रस्त्यावरून वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते तसेच सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या शेतात ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायासाठी बेळगावसारख्या ठिकाणाहून …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील कु. सुरेश लंगोटी 92 किलो वजन गटात कांस्यपदक पटकाविला. या विद्यार्थ्यांला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन …

Read More »