Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

समिती शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

  बेळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई व ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदी निवड झाली आहे. याबद्दल ठाणे येथील ‘आनंद आश्रम’ येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, समिती कार्यकर्ते विकास कलघटगी व बेळगाव जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशन सचिव राजेश लोहार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री …

Read More »

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शनसह इतरांचा जामीन रद्द करण्यास ‘सर्वोच्च’ नकार

  दर्शन आणि इतरांना बजावली नोटीस बंगळूर : रेणुकास्वामी हत्येप्रकरणी कन्नड अभिनेते दर्शन, पवित्रा गौडा आणि इतरांना जामीन देण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला, परंतु कर्नाटक सरकारच्या याचिकेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे मान्य केले. न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक …

Read More »

राष्ट्रीय बालिका दिनाची भेट; राज्यात शुक्रवारी जन्मलेल्या मुलीना मिळणार एक हजाराचे किट्स

    बंगळूर.: आज २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज जन्मलेल्या मुलीला राज्य सरकार भरघोस भेट देणार आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सरकारने सर्व जिल्हा रुग्णालयांना गुलाबी दिव्यांची रोशनाई करण्याचे आणि शुक्रवारी (ता. २४) जन्मलेल्या मुलींना प्रत्येकी एक हजार रुपय किमतीचे किट्स गिफ्ट देण्याचा निर्णय …

Read More »

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अतिथी प्राध्यापकाकडून लैंगिक छळ

  चिक्कोडी आरडी कॉलेजमधील प्रकार चिक्कोडी : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अतिथी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची घटना चिक्कोडी येथील आरडी कॉलेजमध्ये घडली असून या प्रकरणी अतिथी प्राध्यापकाला विद्यार्थिनीच्या पालकांनी मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिक्कोडी शहरातील आरडी कॉलेजमध्ये अतिथी प्राध्यापक कार्यरत असलेल्या राहुल ओतारे याने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला …

Read More »

युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा ४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झाली होती. त्या स्पर्धा परीक्षेचा प्राथमिक लहान गट आणि प्राथमिक मोठ्या गटाचा निकाल जाहीर करत आहोत. बक्षीस वितरण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात येणार आहे. प्राथमिक लहान गटांचे विजेते पहिला क्रमांक …

Read More »

शिवनगी शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न

  बेळगाव : “विद्यार्थ्यांना घडविण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी फक्त शिक्षकांची नसून पालकांनीही लक्ष घातले तर निश्चितच विद्यार्थी अधिक संस्कारक्षम होऊ शकतील”, असे विचार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व पायोनियर अर्बन बँकेचे संचालक अनंत लाड यांनी बोलताना व्यक्त केले. बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या विठ्ठलाचार्य शिवनगी प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन आणि …

Read More »

श्रीलंकेतील क्रिकेटमध्ये ‘बबलू’ने दिले देशाला विजेतेपद

  निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; केली चमकदार कामगिरी निपाणी (वार्ता) : श्रीलंका येथे झालेल्या पी. डी. चॅम्पियन्स (दिव्यांग) ट्रॉफीमध्ये निपाणीचा क्रिकेटपटू नरेंद्र उर्फ बबलु मांगोरे यांनी भारतीय संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताच्या संघाला विजेतेपद मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल निपाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या प्रसाद मोळेराखीची रोटरी बेस्ट स्टुडंट म्हणून निवड

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन यांच्यातर्फे बेळगाव जिल्ह्यातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी बेस्ट स्टुडंट स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये मराठी, कन्नड व इंग्रजी या तिन्ही माध्यमाच्या 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यासर्व विद्यार्थ्यांमधून मराठी विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी प्रसाद बसवंत मोळेराखी याचा प्रथम क्रमांक आला आहे. …

Read More »

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गरीब कुटुंबाचा छळ; तारिहाळ गावातील घटना

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लहान मुलांसह वृद्ध आई – वडिलांना घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. पाच लाखांचे कर्ज घेतलेल्या गणपत लोहार यांच्या घरी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक घरावर जप्तीची कारवाई केली. यावेळी कुटुंबाला कोणत्याही वस्तूला हात लावण्याची परवानगी न देता, संसारोपयोगी सामान …

Read More »

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय ग्रंथालयाला पुस्तकांची भेट

  बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे सुभाषचंद्र बोस जयंती सैनिक भवनमध्ये साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला संघातर्फे ग्रंथालयाला पुस्तकांची भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कलघटगी हे होते. सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जयंतीच्या शुभेच्छा …

Read More »