मुलानेच आई-वडील आणि बहिणीची केली हत्या बंगळूर : विजयनगर जिल्ह्यातील कोट्टुरू येथे एक धक्कादायक तिहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. अक्षय कुमार (आरोपी) याने आपल्या वडील भीमराज, आई जयलक्ष्मी आणि बहीण अमृता यांची २७ जानेवारी रोजी हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने तिघांचे मृतदेह घरातच पुरून टाकले आणि बंगळुरकडे पळ …
Read More »अपमानास्पद पोस्टप्रकरण : केपीसीसीची भाजपच्या ‘एक्स’ अकाउंटविरुद्ध तक्रार; एनसीआर दाखल
बंगळूर : प्रदेश भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ ट्विटर अकाउंटवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेस नेत्यांविरोधात खोट्या आणि अपमानास्पद पोस्ट टाकल्याप्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (केपीसीसी) कायदा शाखेने सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी गैर-गंभीर गुन्हा (एनसीआर) नोंदवला आहे. २९ जानेवारी रोजी भाजप कर्नाटक …
Read More »आयकर विभागाने छापा टाकताच प्रसिद्ध उद्योजकाची स्वत:वर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या
बंगळुरू : कर्नाटकच्या राजधानी बेंगळुरूमध्ये कॉन्फिडेंट ग्रुपच्या चेअरमन आणि मालक सी जे रॉय यांनी ऑफिसमध्ये गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूच्या रिचमंड सर्कलजवळील कॉन्फिडेंट ग्रुपच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेने उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून सीजे रॉय यांच्या कार्यालयात छापा सुरू होता. विभागाचे अधिकाऱ्यांकडून कार्यालयात चौकशी …
Read More »आंतर शालेय वक्तृत्व, चित्रकला स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
नूतन मराठी विद्यालयात आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रा. चंद्रहास धुमाळ यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आंतर शालेय वकृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा झाल्या. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना …
Read More »पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने बोरगाव ‘अरिहंत’तर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बेळगाव केएलई संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार प्रभाकर कोरे यांना त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक जीवनातील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानिमित्त बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी डॉ. कोरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. …
Read More »अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी खानापूर समितीच्या वतीने शोकसभा
खानापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवस्मारक खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व मराठी भाषिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …
Read More »उद्या श्री समादेवी पालखी सोहळा, रविवारी महाप्रसाद
बेळगाव : समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आज गुरुवारी श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळाचा उद्या शनिवार दि. ३१ रोजी मुख्य दिवस असून सायंकाळी श्रीच्या पालखीने प्रदक्षिणा होणार आहे. रविवार दि. १ रोजी सकाळी ६-३० ते ११ वाजेपर्यंत नव …
Read More »सुनेत्रा पवार यांची उद्या उपमुख्यमंत्रीपदी निवड होणार, लगेचच शपथविधी
मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची शनिवारी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधी पार पडेल, असे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी उद्या, शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या …
Read More »युवा समिती आयोजित भव्य “सामान्यज्ञान स्पर्धा २०२६” स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य “सामान्यज्ञान स्पर्धा २०२६” मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या स्पर्धेतील प्राथमिक लहान आणि मोठ्या दोन गटाचे निकाल जाहीर करीत आहोत. प्राथमिक लहान …
Read More »न्यू गुडशेड रोड येथील श्री गणेश मंदिरात प्राणप्रतिष्ठा व आगमन सोहळा
बेळगाव : बेळगाव शहरातील न्यू गुडशेड रोड, ५ वा क्रॉस परिसरातील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून आता मंदिरात नवीन श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मूळक व उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता भव्य श्री गणेश आगमन मिरवणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta