Monday , September 21 2026
Breaking News

हुन्नरगी येथील बिनदाती घोडा- बैलगाडी शर्यतीत संज्योत सुतळे यांची गाडी प्रथम

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी-नारायण यात्रेनिमित्त आयोजित बिन दाती घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये हुन्नरगी येथील संज्योत सुतळे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर अभिषेक मुरदंडे- हुन्नरगी, ज्योतिबा प्रसन्न- वाघापूर यांच्या गाड्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळवली.
नवतर बिन दाती घोडागाडी शर्यतीत किशोर पुजारी -कोडोली, धीरज कोळी-कागल आणि तावदारे यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची बक्षिसे पटवली.
जनरल घोडा -बैलगाडी शर्यतीतअर्पित मुल्ला -सदलगा, सोहेल कलावंत- हुन्नरगी, अभय चव्हाण -जांभळी यांनी बक्षीसे मिळवली. जनरल घोडा- गाडी शर्यतीत किशोर पुजारी -कडोली, मल्हार-बोरगाव, अक्षय धुळे- यळगुड,पाडा -बैलगाडी शर्यतीत रंजीत जाधव -कापशी, अभिजीत पाटील- हुन्नरगी, बाळूमामा प्रसन्न -कुर यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची बक्षीसे मिळवली. यावेळी सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यात्रा कमिटीतर्फे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *