Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

  कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात १ ते ५ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर व्याख्यानाचे आयोजन; ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांची उपस्थिती

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ सीमा भागातील शिक्षक बांधवांसाठी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे ‘मुलांच्या विवेकी जडणघडणीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावरचे व्याख्यान शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ …

Read More »

जगाच्या नकाशावरून आतंकवाद्याचे नामो निशाण मिटवून टाका : प.पू प्राणलिंग स्वामीजी

  दिल्ली येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध निपाणी : पाकिस्तान हा निर्माण झाल्यापासून आपल्या देशावर सतत आतंकवाद्यांच्या माध्यामापासून कुरघोडी करत आहे. या आतंकवाद्याचे हृदय परिवर्तन कधीच होणार नाही. या आतंकवादीची पाळ मूळ जगाच्या नकाशावरून पुसून टाकावेच लागेल, तरच देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतील. आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट …

Read More »

बेळगाव विधानसभेचे हिवाळी अधिवेशन: आवश्यक तयारीसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश

  बेळगाव : येत्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. अधिवेशन काळात वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, भोजन त्याचप्रमाणे संपर्क सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनात उत्तम प्रकारे आयोजन व्हावे …

Read More »

हलसाल येथे हत्तींकडून भात पिकाचे नुकसान

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल येथे हत्तींच्या कळपाने भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. मागील दोन दिवसांपासून आठ ते दहा हत्तींचा कळप हलसाल येथील जमिनीत थैमान घालत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खानापूर …

Read More »

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव पार पडला

  बेळगाव : दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात आली. कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिरा अध्यक्ष राहुल कुरणे व प्रमुख उपस्थित मान्यवर अमित देसाई यांच्या हस्ते विशेष रुद्र अभिषेक कालभैरव स्तोत्र पठण केले. त्या नंतर विशेष पुषअर्चना …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे उत्साहात संपन्न झाल्या. 25 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी कथाकारांची निवड करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक गटाच्या कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव पी. पी. बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

विजेच्या खांबाला कारची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

  बैलहोंगल तालुक्यातील घटना बैलहोंगल : कार चालकाचा ताबा सुटून कार थेट विजेच्या खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अतिक (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावात ही घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अपघाताच्यावेळी बेळगावहून बैलहोंगलच्या दिशेने निघालेल्या या …

Read More »

के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय साहित्य महोत्सव थाटामाटात संपन्न

  राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे विविध स्पर्धांचे आयोजन; सर्वसाधारण विजेते पद जीआय महाविद्यालय बेळगाव बेळगाव : येथील के.एल.ई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रेजी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य महोत्सवाचा प्रमुख विषय भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि साहित्य असा होता. या साहित्य …

Read More »

अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूह बोरगांवचे कार्याध्यक्ष, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा ५० वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अरिहंत सहकारी जवळी गिरणी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला बोरगाव सह परिसरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेवक अभय कुमार मगदूम …

Read More »